Home राजकीय प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सोलापूर दौऱ्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा; विजयाचा निर्धार अधिक मजबूत

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सोलापूर दौऱ्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा; विजयाचा निर्धार अधिक मजबूत

5 second read
0
0
4

no images were found

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सोलापूर दौऱ्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा; विजयाचा निर्धार अधिक मजबूत

कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्याचा एकदिवसीय दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध संघटनात्मक बैठका, शिक्षक संघटनांशी संवाद आणि पक्षप्रवेश सोहळ्याच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीला गती दिली. त्यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला बळ देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विविध संघटनात्मक बैठकींतून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. संघटनात्मक तयारीचा आढावा घेताना प्रत्येकाने आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी, मतदारांपर्यंत आपल्या सरकारच्या लोककल्याणकारी कामगिरीचा लेखाजोखा सरकारपर्यंत पोहोचवावा आणि विजयासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढण्यासह निवडणुकीच्या नियोजनाला अधिक गती मिळाली.

या दौऱ्यात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिनिधींसमवेत चव्हाण यांची बैठक झाली. संघटनेच्या मागण्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न जाणून घेत, ते सोडवण्यासाठी भाजपा-महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेने पत्राद्वारे भाजप-महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.

मंगळवेढा येथे नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, सोलापूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे, मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, मंगळवेढा नगर परिषदेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड, नगरसेवक अनिल बोदाडे, नगरसेवक प्रमोद सावंजी, नगरसेविका विद्यागौरी अवघडे, सोमनाथ बुरजे, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक भीमराव येडवे, मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे संचालक राजू पाटील, संचालक हणमंत मासाळ, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशील आवताडे, उपसभापती सहदेव लवाटे, संचालक प्रकाश जुंदळे, संचालक पांडुरंग कांबळे, संचालक मनोज चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या दौऱ्यात मंत्री जयकुमार गोरे, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार विजय देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, प्रदेश सचिव तथा माजी आमदार राम सातपुते, सोलापूर शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांशी थेट संवाद, संघटनात्मक नियोजन आणि पक्षविस्तार यांवर भर देणारा रविंद्र चव्हाण यांचा हा दौरा सोलापूर जिल्ह्यात भाजप-महायुतीच्या प्रचाराला नवी दिशा देणारा ठरला. कार्यकर्त्यांचा वाढलेला उत्साह आणि एकजुटीच्या बळावर दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार अधिक मजबूत झाला आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

हजारो भाविकांनी घेतला चित्पावन संघाच्या अष्टमी जागर सोहळ्याचा लाभ

हजारो भाविकांनी घेतला चित्पावन संघाच्या अष्टमी जागर सोहळ्याचा लाभ कोल्हापूर: कोल्हापूर चित…