Home राजकीय जे लोक केवळ दिखावा करण्यासाठी संविधान हातात घेऊन फिरतात, त्यांनी संविधानाची खरी भावना समजून घ्यावी

जे लोक केवळ दिखावा करण्यासाठी संविधान हातात घेऊन फिरतात, त्यांनी संविधानाची खरी भावना समजून घ्यावी

0 second read
0
0
6

no images were found

जे लोक केवळ दिखावा करण्यासाठी संविधान हातात घेऊन फिरतात, त्यांनी संविधानाची खरी भावना समजून घ्यावी
राहुल गांधी यांनी संवैधानिक संस्थांचा केवळ अपमान केला आहे
भाजपशासित सर्व राज्यांमध्ये लवकरच समान नागरी कायदा लागू केला जाईल
नवी दिल्लीतील नोव्हेंबर महिन्याच्या एका थंडगार संध्याकाळी ‘संविधान गौरव दिना’च्या कार्यक्रमाचा मंच एका वेगळ्याच उत्साहाने उजळून निघाला. मंचावर उभे असलेले निक भारताचे चाणक्य, अमित शाह यांनी इतिहासातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. तसेच आजच्या आव्हानांवर आणि देशाच्या भविष्यातील संकल्पांवरही आपले विचार मांडले. त्यांच्या संपूर्ण भाषणात संविधानाचा सन्मान, घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा आणि देशाच्या भविष्याबाबतचा स्पष्ट राजकीय दृष्टिकोन दिसून आला.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी सर्वप्रथम केवळ दिखावा करण्यासाठी संविधान हातात घेणाऱ्यांना खडे बोल सुनावले. त्यांनी संविधानाच्या मूळ प्रतीचा उल्लेख केला. संसद भवनाच्या ग्रंथालयात ठेवलेल्या या ऐतिहासिक दस्तऐवजातील प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला प्रभू श्रीराम, भगवान बुद्ध, भगवान महावीर, गुरु गोबिंद सिंह, राणी लक्ष्मीबाई, दांडी यात्रा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची चित्रे आहेत, असे त्यांनी सांगितले. या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करून शाह यांनी स्पष्ट केले की, संविधानाची खरी भावना समजून न घेता त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे म्हणजे संविधानाचा सन्मान नव्हे, तर त्याचा अपमान करणे होय.
संविधानाचा उद्देश असा आहे की, देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळावेत, सरकारी योजनांचा लाभ कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट त्याच्यापर्यंत पोहोचावा आणि त्याला सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळावी. याचे जिवंत उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 80 कोटी गरीब नागरिकांपर्यंत बँक खाती, वीज, शौचालय, पाणी, मोफत धान्य, आरोग्य सुरक्षा आणि गॅस सिलिंडर यांसारख्या सुविधा पोहोचल्या. कोणत्याही मध्यस्थाशिवाय सरकारी योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले.
आज संपूर्ण देशाला माहीत आहे की, अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली कलम 370 रद्द करण्यात आले, नक्षलवाद आणि दहशतवादाला आळा घालण्यात आला. ईशान्य भारतातील हजारो उग्रवादी मुख्य प्रवाहात परतले. बस्तरसारख्या भागांमध्ये अनेक वर्षांपासून विकासापासून दूर राहिलेल्या लोकांना संवैधानिक अधिकार मिळाले. अमित शाह यांच्या ठाम रणनीतीतून एक स्पष्ट संदेश देण्यात आला की, संविधानाचा सन्मान तेव्हाच खऱ्या अर्थाने सार्थ ठरतो, जेव्हा त्याचा लाभ देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

धैर्यशील भोसले याची जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी; ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटूचा मान

धैर्यशील भोसले याची जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी; ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह सलग तिसऱ्…