Home गौरव सन्मान धैर्यशील भोसले याची जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी; ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटूचा मान

धैर्यशील भोसले याची जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी; ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटूचा मान

4 second read
0
0
6

no images were found

धैर्यशील भोसले याची जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी; ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटूचा मान
कोल्हापूर : अंतरविभागीय क्रीडा परिषद २०२६-२७ अंतर्गत विद्या प्रसारक मंडळ व गडहिंग्लज येथील डॉ. घाळी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या अंतरविभागीय जलतरण स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या School of Engineering and Technology या अधिविभागात चौथ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या धैर्यशील किरण भोसले याने घवघवीत यश संपादन केले.
विविध जलतरण प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत धैर्यशीलने ५ सुवर्ण व ४ रौप्य अशी एकूण ९ पदके पटकावली. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याने सलग तिसऱ्या वर्षी ‘सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटू’ हा बहुमान प्राप्त केला आहे.
धैर्यशीलच्या या यशाला आणखी एक महत्त्वपूर्ण जोड मिळाली असून, चेन्नई (तामिळनाडू) येथे दिनांक १६ ते २२ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
या यशस्वी कामगिरीसाठी शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. डॉ. आर. के. कामत, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ. ए. बी. कोळेकर व क्रीडा समन्वयक डॉ. प्रविण सावंत यांनी धैर्यशीलचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. धैर्यशीलला या यशस्वी कामगिरीसाठी प्रशिक्षक श्री. प्रभाकर डांगे यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.
धैर्यशीलच्या या दैदीप्यमान यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, आगामी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेतही तो उत्कृष्ट कामगिरी करून शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान
Comments are closed.

Check Also

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाची मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पाहणी

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाची मं…