no images were found
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार
कोल्हापूर :- आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणीजनांचा महापौर सौ.रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ. शिल्पा विश्वराज साळोखे (दिनांक २ ते ५ सप्टेंबर २०२६ दरम्यान शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली येथे आयोजित मास्टर्स हॉकी कप २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील हॉकी स्पर्धेत सहभाग घेवून उत्कृष्ट कामगिरी करून पदक पटकाविलेबद्दल), कु.आर्वी अजिंक्य कुलकर्णी (लोकमत कॅम्पस क्लब आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ५ वर्षां खालील गटात तसेच अवघ्या तीसऱ्या वर्षी जानेवारी २०२६ मध्ये पुणे येथे संपन्न झालेल्या ओपन नॅशनल चॅम्पीयनशीप या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून सुवर्ण पदक पटकाविलेबद्दल), कु.इप्सित शैलेश उबाळे (वयाच्या दुसऱ्या वर्षी सलग ८० मिनिटाच्या अखंड स्केटिंग मॅरेथॉनमध्ये सहभाग घेवून, चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून दुबई बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस नोंदविलेबद्दल), कु.पृथ्वीराज बाळासाहेब कोळेकर (भारतीय हॅंडबॉल संघात आपल्या कौशल्यावर दोन वेळा तसेच सन २०२५ मध्ये झालेल्या आशियाई चषक हँडबॉल स्पर्धेमध्ये निवड झाली असून, यावर्षी जॉर्डन देशात झालेल्या झालेल्या आशियाई चषक हँण्डबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेला महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवून चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले तसेच दिल्ली व तेलंगणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्त्व केलेबद्दल), कु.स्वरा अमर सुर्यवंशी (दिनांक २३ ते २५ ऑक्टोंबर २०२६ रोजी इनडोअर स्पोर्टस् फॅसिलिटी सेंटर जनता कॉलेज गलकापूर, बुलढाणा येथे आयोजित राज्यस्तर शालेय बैडमिटन क्रिडा स्पर्धा 2026-27 मध्ये सहभाग घेऊन चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून सुवर्ण पदक पटकाविलेबद्दल), प्रा.डॉ.संजय हिंदूराव दाभोळे (शिक्षण क्षेत्रातील तांत्रिक शिक्षण योगदानाबाबत इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्या मार्फत सन २०२६ चा बेस्ट प्रिन्सीपल (डिप्लोमा) या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. शहरातील शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद व गौरवास्पदबाब असून त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल), कु.आयुष संजय दाभोळे (वयाच्या १५ व्या वर्षी लिहीलेल्या ‘द विन्टर पल्स’ या पुस्तकाला राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बेस्टसेलर म्हणून मान मिळाला आहे. तसेच ‘ऑप्टीमम इनहिजीबिलीटी सेटअप बेसड ऑन द संचिस्टर क्लॉक’ या विषयावर वैज्ञानिक लेख तयार करून सन २०२५ मध्ये प्रतिष्ठित आयजेटीई जरनल मध्ये प्रकाशित केला त्यांच्या संशोधनाची दखल घेवून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस यांचेवतीने आयबीआर ॲचिवर हा किताब प्रदान करण्यात आला. तसेब लेखन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबहल सिल्वहर, गोल्ड आणि प्लेटिनियम स्टार यंग ॲथोर अशी प्रमाणपत्रे मिळाली तसेच बास्केटबॉल आणि विज्ञान प्रदर्शनातील राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये यश संपादन केले त्यांच्या या साहित्य, विज्ञान संशोधन आणि क्रिडा अशा विविध क्षेत्रामध्ये मिळविलेल्या यशाबद्दल), कु.आदिराज नेत्रपाल जाधव (बेंगळुरू, कर्नाटक येथे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय ज्यूनियर फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झालेबद्दल) व डॉ.पुलकित खंबायते, मनाली शिवचरण, आरोही पाटील, गीता खोत, श्रीमती मनीषा मोरे, नंदिनी माने, येरूशा काळे, दिपाली शेटके, रुपाली युरमुले, आम्रपाली पाटील, प्रचिती पखाने, प्रथमेश हावळ व यश मोळे (कोल्हापुर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील लोकांना चांगली सुविधा देणे हे मुख्य उद्दीष्ट असून त्या अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागातील कुटुंब कल्याण केंद्र ५. कसबा बावडा यांनी अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर झालेल्या गुणवत्ता अश्वासन मुल्यांकन पडताळणीमध्ये ९०.१८ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल) या सर्वांचा महापौर सौ.रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती सौ.दिपा ठाणेकर, प्रभाग समिती सभापती वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण, सभागृह नेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता शारंगधर देशमुख, आदिल फरास, इंद्रजित बोंद्रे, सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, आरोग्य विशेष समिती सभापती सुरेखा ओटवकर, उपसभापती वैभव माने, पाणी पुरवठा विशेष समिती सभापती सौ.संगीता सावंत, उपसभापती सौ.दिपा काटकर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ.शिला सोनुले, उपसभापती सौ.पुजा पोवार, क्रीडा समिती सभापती विजयसिंह खाडे-पाटील, उपसभापती रोहित कवाळे, नगरसचिव दिवाकर कारंडे, नगरसेवक/नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते.