no images were found
भारतातील सर्वात लांब विंड टर्बाइन ब्लेडचे अदाणी विंडमध्ये उत्पादन सुरू; 5 MW प्लॅटफॉर्मला सीरियल प्रोडक्शनसाठी प्रमाणपत्र एडिटर सिनॉप्सिस
· अदाणी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (एएनआयएल) ने गुजरातमधील मुंद्रा येथील आपल्या इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये भारतातील सर्वात लांब 91.2 मीटरच्या ऑनशोअर विंड टर्बाइन ब्लेडचे उत्पादन सुरू केले आहे.
· भारतात तयार करण्यात आलेले हे ब्लेड अदाणी विंडच्या MWL185-5.0 MW टर्बाइनसाठी तयार करण्यात आले आहेत. या टर्बाइनचा रोटर डायमीटर 185 मीटर आणि हब हाइट 140 मीटर आहे. यामुळे वेगवेगळ्या वाऱ्याच्या वेगातही सातत्याने वीज निर्मिती करणे शक्य होणार असून उपलब्ध क्षमतेचा अधिक चांगला वापर करता येणार आहे.
· जर्मनीतील स्वतंत्र विंड टर्बाइन टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन संस्था विंडगार्ड सर्टिफिकेशन GmbH ने अदाणी विंडच्या 5 MW प्लॅटफॉर्मला प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे आता या प्लॅटफॉर्मचे सीरियल प्रोडक्शन सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
· या दोन्ही महत्त्वाच्या टप्प्यांमुळे भारतातील देशांतर्गत विंड मॅन्युफॅक्चरिंग क्षमता वाढण्यास मदत होणार असून पुढील पिढीतील विंड एनर्जी टेक्नॉलॉजीच्या विकासाला चालना मिळणार आहे.
अहमदाबाद, : अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) ची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या अदाणी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (एएनआयएल) ने गुजरातमधील मुंद्रा येथील आपल्या इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये 91.2 मीटर लांबीच्या ऑनशोअर विंड टर्बाइन ब्लेडचे उत्पादन सुरू केले आहे. यासोबतच कंपनीला आपल्या MWL185-5.0 MW विंड टर्बाइन प्लॅटफॉर्मसाठी सर्टिफिकेशन मिळाले आहे. त्यामुळे आता या प्लॅटफॉर्मचे सीरियल प्रोडक्शन सुरू करता येणार आहे.
91.2 मीटर लांबीचे हे ब्लेड भारतात तयार करण्यात आलेले आतापर्यंतचे सर्वात लांब विंड टर्बाइन ब्लेड आहेत. MWL185-5.0 MW प्लॅटफॉर्मसाठी तयार करण्यात आलेले हे ब्लेड 185 मीटर रोटर डायमीटर आणि 140 मीटर हब हाइट असलेल्या टर्बाइनमध्ये वापरले जातील. या टर्बाइनचा रोटर जवळपास 26,600 चौरस मीटर क्षेत्रात फिरतो. हे क्षेत्रफळ तीनपेक्षा जास्त आणि अर्ध्या फुटबॉल मैदानांइतके आहे. MWL185-5.0 MW प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या वाऱ्याच्या वेगाचा उपयोग करून सातत्याने वीज निर्मिती करण्यास मदत करतो. यामुळे उपलब्ध वाऱ्याचा अधिक चांगला वापर होतो आणि एकूण कॅपॅसिटी युटिलायझेशन फॅक्टर (CUF) सुधारण्यास मदत होते.
या नवीन ब्लेडमुळे मुंद्रा येथील उत्पादन केंद्रात तयार होणाऱ्या उत्पादनांच्या श्रेणीत आणखी वाढ झाली आहे. सध्या या फॅसिलिटीमध्ये 78.6 मीटर आणि 80.5 मीटर लांबीच्या ब्लेडचे उत्पादन केले जाते. आता 91.2 मीटर लांबीच्या ब्लेडचे उत्पादन सुरू करणे ही ब्लेड डिझाइन, मटेरियल इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंगमधील अचूकता आणि हाताळणीच्या क्षमतेच्या दृष्टीने मोठी प्रगती आहे. यामुळे पुढील पिढीतील मोठ्या विंड टर्बाइनसाठी आवश्यक असलेले मोठे घटक भारतात तयार करण्याची क्षमता वाढणार आहे.
अदाणी विंडचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (सीईओ) मिलिंद कुलकर्णी म्हणाले, “भारतातील सर्वात लांब विंड टर्बाइन ब्लेडचे उत्पादन सुरू करणे आणि आमच्या 5 MW प्लॅटफॉर्मला सर्टिफिकेशन मिळणे हा अदाणी विंड आणि देशातील विंड मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. मोठे ब्लेड आणि अधिक क्षमतेच्या टर्बाइनमुळे प्रत्येक टर्बाइनला अधिक ऊर्जा निर्माण करणे शक्य होते. कमी वाऱ्याचा वेग असलेल्या ठिकाणीही याचा फायदा होतो. यामुळे विंड एनर्जीच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्यासाठी अधिक ठिकाणांचा वापर करता येऊ शकतो. देशाच्या वाढत्या क्लीन एनर्जीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतातच प्रगत विंड टेक्नॉलॉजी विकसित आणि तयार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
भारतातील विंड एनर्जीची क्षमता वाढवण्याच्या दिशेने
विंड टर्बाइनमधून किती वीज तयार होईल, हे त्याच्या रोटरच्या फिरण्याच्या क्षेत्रफळावर, ठरवून दिलेल्या क्षमतेवर, हब हाइटवर आणि संबंधित ठिकाणी उपलब्ध असलेल्या वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. MWL185-5.0 MW प्लॅटफॉर्मचा रोटर डायमीटर जवळपास 185 मीटर असून त्याचे रोटर स्वीप्ट एरिया जवळपास 26,600 चौरस मीटर आहे. कमी आणि मध्यम वाऱ्याचा वेग असलेल्या ठिकाणीही अधिक ऊर्जा निर्माण करता यावी, या उद्देशाने हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. त्यामुळे विंड पॉवर प्रोजेक्टसाठी अधिक ठिकाणे तांत्रिक आणि व्यावसायिकदृष्ट्या योग्य ठरू शकतात.
जर्मनीतील स्वतंत्र विंड टर्बाइन टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन संस्था विंडगार्ड सर्टिफिकेशन GmbH ने गुजरातमधील मुंद्रा येथे टर्बाइनच्या प्रोटोटाइपची चाचणी घेतल्यानंतर अदाणी विंडच्या MWL185-5.0 MW प्लॅटफॉर्मला प्रमाणपत्र दिले आहे. हा MWL185-5.0 प्लॅटफॉर्म अदाणी विंडने आपले जर्मन टेक्नॉलॉजी पार्टनर W2E (Wind to Energy) यांच्या भागीदारीत तयार केला आहे. या सर्टिफिकेशनमुळे विंड टर्बाइनच्या डिझाइन, टेस्टिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेल्या IEC 61400 स्टँडर्ड्सचे पालन होत असल्याची खात्री मिळाली आहे.
अदाणी विंडकडे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या (MNRE) Approved List of Models and Manufacturers (ALMM-Wind) अंतर्गत नोंदणी असलेले तीन टर्बाइन प्लॅटफॉर्म आहेत. तसेच 2025 च्या BloombergNEF च्या जगातील टॉप 15 टर्बाइन उत्पादकांच्या यादीत स्थान मिळवणारी अदाणी विंड ही एकमेव भारतीय विंड टर्बाइन उत्पादक कंपनी आहे.
अदाणी विंडच्या MWL 160-5.2 MW प्लॅटफॉर्मने गुजरातमधील खावडा येथे 2 GW पेक्षा जास्त इन्स्टॉलेशनचा टप्पा पार केला आहे. हा भारतातील ALMM-Wind अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्वाधिक क्षमता असलेल्या ऑनशोअर विंड टर्बाइनपैकी एक आहे. खावडा येथे जगातील सर्वात मोठा रिन्यूएबल एनर्जी प्लांट आहे.
नुकत्याच मिळालेल्या ऑर्डर्समुळे अदाणी ग्रुपच्या बाहेरील इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स (IPPs) कडून अदाणी विंडला मिळालेल्या एकूण ऑर्डर्सचे प्रमाण आता 1 GW पेक्षा जास्त झाले आहे.