no images were found
डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम
-बंगळुरू येथील स्पर्धेत ‘रेलमार्ग’चा गौरव
कसबा बावडा(प्रतिनिधी): – डी. वाय. पाटील अभियांत्रिकी(अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यानी बेंगळूरू येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी तयार केलेली ‘रेलमार्ग’ प्रणालीचा यावेळी गौरव करण्यात आला.
के. एस. स्कुल ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट, बंगळुरू येथे झालेल्या ‘अन्वेषण 2026’ या स्पर्धेत देशभरातील 100 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांतील 350 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी 24 तासांमध्ये तयार केलेली ‘रेलमार्ग’ नावाची रेल्वेच्या आदान- प्रदान संबंधित प्रणाली विशेष लक्षवेधी ठरली. या संघाला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
विजयी संघात संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या श्रेया काळेबेरे, शुभम पट्टेवार, अनुज पोवार व प्रीती सोनुले या चार विद्यार्थ्यांसमवेत प्रोजेक्ट गाइड प्रा.सौ. सोनाली शिंगे यांचा समावेश आहे. या संघाला सन्मान चिन्ह , प्रमाणपत्र व रोख २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिकही प्रदान करण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के . गुप्ता, प्राचार्य डॉ. संजय पवार, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. राधिका ढणाल यांनी संघातील विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.