Home शासकीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचा शुभारंभ

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचा शुभारंभ

0 second read
0
0
87

no images were found

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचा शुभारंभ
18 वर्षावरील महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी
कोल्हापूर : नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये 18 वर्षावरील महिला, माता व गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची तपासणी, प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ही मोहिम शासनाने निर्देशानुसार राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा शुभारंभ पंचगंगा हॉस्पिटल येथे महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व डॉ.कादंबरी बलकवडे प्रशासक यांचे शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आला. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले हॉस्पीटल येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.1 येथे आमदार श्रीमती जयश्री जाधव यांच्या शुभहस्ते व महाडिक माळ येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.6 येथे भागिरथी महिला मंचच्या अध्यक्षा सौ.अरुंधती महाडिक यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले प्राथमिक नागरी आरोगय केंद्रामार्फत प्रभात फेरीचे नियेाजन करुन भागामध्ये जनजागृती करण्यात आली होती .
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बोलताना राज्य शासनाच्यावतीने राज्यात विविध योजना व उपक्रम राबविले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हा उपक्रम राबविला आहे.
यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त संदिप घार्गे, आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव, आरसीएच नोडल ऑफिसर डॉ.अमोलकुमार माने, प्रशायकी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश पावरा, डॉ.विद्या काळे, डॉ.रती अभिवंत, वैद्यकिय अधिकारी डॉ.रुक्सार मोमीन, सावित्रीबाई फुले, महाडिक माळ व पंचगंगा रुग्णालयाकडील सर्व स्टाफ उपस्थित होता.
सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे गरोदर मातासाठी दि.27, 29 सप्टेंबर व 3 ऑक्टोंबर 2022 रोजी सोनोग्राफी शिबिराचे नियोजिन करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…