Home क्राईम हडपसरमध्ये भीषण अपघातात 1 ठार, 3 जखमी

हडपसरमध्ये भीषण अपघातात 1 ठार, 3 जखमी

0 second read
0
0
62

no images were found

हडपसरमध्ये भीषण अपघातात 1 ठार, 3 जखमी

पुणे : सकाळी पुण्यामधील हडपसर परिसरात कंटेनर आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कंटेनरने दुचाकी आणि रिक्षाला धडक दिल्यामुळे रिक्षाचा चुराडा झाला आहे. अपघात इतका भीषण होता की या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीनजण गंभीर जखमी आहेत.  सकाळी ५.३० ते ६ च्या दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कुटीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात सिमेंट मिक्सर चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने हा कंटनेर रिक्षावर पलटी झाला आणि रिक्षाचा जागीच चुराडा झाला. रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य तीनजण जखमी आहेत. सोलापूर रस्त्यावर रवीदर्शन समोरील लक्झरी आणि एसटी बसच्या थांब्यावर पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता काही नागरिकांकडून व्यक्त केली जात असून या अपघात नंतर सोलापूर रोडवर बराच काळ वाहतूक कोंडी झाल्याचे समजते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…