Home क्राईम जम्मू काश्मिरमध्ये दुसरा स्फोट

जम्मू काश्मिरमध्ये दुसरा स्फोट

0 second read
0
0
92

no images were found

जम्मू काश्मिरमध्ये दुसरा स्फोट

जम्मू : जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी कारवायांत वाढ होत असतानाच मागिल आठ तासांत दुसरा स्फोट झाल्याची घटना घडली. उदमपूर येथे पार्किंगमध्ये लावलेल्या ट्रॅव्हल बसमध्ये हा स्फोट झाल्यामुळे खळबळ उडाली असून या स्फोटात कोणीही जखमी झालेले नाही. आज पहाटेच्या दरम्यान हा हा स्फोट घडल्याची माहिती आहे.

बुधवारी रात्री 10.45 च्या सुमारास काश्मिरातील डोमाईल चौकात बसमध्ये असाच गूढ स्फोट झाला असून त्यात दोघे जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. दुसरा स्फोट आज पहाटे झाला असून पहिल्या घटनास्थळापासून फक्त ४ किमी अंतरावर झाल्याने खळबळ उडाली असून पोलीस तसेच सुरक्षा जवान अधिक सतर्क झाले आहेत.

या स्फोटामुळे ट्रॅव्हलचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिस आणि तपास संस्थाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…