no images were found
PFI च्या ट्विटर अकाउंटवरही बंदी
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने पीएफआयवर 5 वर्षांच्या बंदीनंतर ही कारवाई केली आहे. भारत सरकारच्या तक्रारीनंतर ट्विटर इंडियाकडून पीएफआयच्या खात्यावर बंदी घालण्यात आली आहे.
केंद्र सरकारने 28 सप्टेंबर रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातली. अनेक राज्यांनी पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर एनआयए, सर्व राज्यांचे पोलीस आणि एजन्सींनी पीएफआयच्या कार्यालयावर छापे टाकले आणि अनेक लोकांना अटक केली. केंद्रीय गृह मंत्रालयानं पीएफआयला 5 वर्षांसाठी प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित केलं. पीएफआय व्यतिरिक्त 8 संलग्न संस्थांवरही कारवाई करण्यात आली आहे.
पीएफआयसह अन्य रिहॅब इंडिया फाउंडेशन, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम कौन्सिल, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्यूमन राइट्स ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन फ्रंट, ज्युनियर फ्रंट, एम्पॉवर इंडिया फाउंडेशन आणि रिहॅब फाउंडेशनसारख्या सहयोगी संघटनांवरही बंदी घालण्यात आली आहे.