Home राजकीय अखिलेश यादव तिसऱ्यांदा सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष

अखिलेश यादव तिसऱ्यांदा सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष

0 second read
0
0
113

no images were found

अखिलेश यादव तिसऱ्यांदा सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष

समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यादव यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी राम गोपाल यादव यांनी त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा यावेळी केली. पक्षश्रेष्ठींनी त्यांचे अभिनंदन करून पक्षासाठी लढत राहण्याची ग्वाही दिली.

अखिलेश यादव हे तिसऱ्या वेळी सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनत आहेत. १ जानेवारी २०१४ रोजी त्यांना पहिल्यांदाच मुलायमसिंह यादव यांच्या जागी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०१७ मध्ये आग्रा येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची पुन्हा एकदा पक्षाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती. यापूर्वी अखिलेश यादव यांचे वडील मुलायम सिंह यादव हे पक्षाच्या स्थापनेपासून अध्यक्ष होते. ऑक्टोबर १९९२ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून आजतागायत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद यादव कुटुंबाकडेच आहे. अखिलेश यांच्या अगोदर मुलायमसिंह यादव पक्षाचे अध्यक्ष होते. याआधी सपाच्या प्रांतीय अधिवेशनात नरेश उत्तम पटेल यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…