Home धार्मिक हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी”:मान्यवरांसह हजारो भाविकांची हजेरी श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनाने भक्तीचा महासंगम

हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी”:मान्यवरांसह हजारो भाविकांची हजेरी श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनाने भक्तीचा महासंगम

3 second read
0
0
22

no images were found

हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी”:मान्यवरांसह हजारो भाविकांची हजेरी श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनाने भक्तीचा महासंगम

नांदेड, :- “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंदराव तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, पोहरादेवीचे, महंत, सुनील महाराज,बाबुसिंग महाराज, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोड यांच्यासह हजारो भाविकांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले.

सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. सर्व जिल्ह्यातून व नांदेड शहरातून आलेल्या हजारो भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत.

भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे. भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेताना दिसून येत आहेत. गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहीदी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता व एकतेचा संदेश पोहोचत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…