Home धार्मिक न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

6 second read
0
0
4

no images were found

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

कोल्हापूर – भारतात सर्व धर्मांना उपासनेचे स्वातंत्र्य आहे; मात्र या उपासनेने दुसर्‍याला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये याची दक्षता घेणे तितकेच आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने शांत झोप हा एक मूलभूत अधिकार मानून ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात काटेकोर नियम घालून दिले आहेत. आवाजाची मर्यादा पाळण्यासह रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कोणत्याही प्रकारचा ध्वनीक्षेपकाचा आवाज होता कामा नये, असे मा. न्यायालयाचे आदेश दिले आहेत; परंतु या आदेशाची अंमलबजावणी मशिदींवरील भोंग्याबाबत कोठेही दिसून येत नाही. अनेक ठिकाणी या आदेशाची पायमल्ली करत पहाटे 5 ते 5.30 या वेळेत पहिली अजान देण्यात येते. इतकेच नव्हे तर एकाच मशिदीवर चार-चार दिशांनी लावलेल्या या भोंग्यांचा आवाज सर्वसामान्य नागरिकांसाठी त्रासदायक तथा मानसिक स्वास्थ्य बिघडवणारा ठरत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा, तसेच या संदर्भात वेळोवेळी देण्यात आलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान राखत ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी मशिदींवरील अनधिकृत भोंगे कायमस्वरूपी बंद करावेत, या मागणीसाठी हिंदु राष्ट्र समन्वय समिती, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, सकल हिंदू समाज कोल्हापूर यांच्या वतीने पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. कृष्णात पोवार, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम जरग, विश्‍व हिंदु परिषेदेचे जिल्हामंत्री श्री. विनय बारड, श्री. सुनील शिंदे, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे श्री. विकास जाधव, श्री. प्रशांत पाटील, अखिल भारत हिंदू महासभेचे श्री. संजय कुलकर्णी आणि श्री. सुनील सामंत, श्री. प्रशांत पाटील, श्री. कृष्णात दिंडे, ऋण मातृभूमीचे अध्यक्ष श्री. सौरभ निकम, हिंदू जागरणचे श्री. सनी पेडणेकर, ओम काली हिंदवी स्वराज्य सेना जिल्हाध्यक्ष श्री. विशाल पाटील, आंतरराष्ट्रीय बजरंग दल-राष्ट्रीय हिंदू परिषदचे जिल्हा संयोजक श्री. पंढरीनाथ ठाणेकर, श्री. दत्तात्रय पाटील, श्री. संतोष हत्तीकर, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे, शिवकन्या अंजली जाधव, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव यांसह अन्य उपस्थित होते.
अनेक मशिदी या शाळा, महाविद्यालये, रुग्णालये यांच्या परिसरात येतात. या मशिदींमधून देण्यात येणारी अजान वेळी-अवेळी असल्याने विद्यार्थी, रुग्ण यांना मोठ्या प्रमाणात अकारण मानसिक, शाररिक त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिकरित्या मोठ्या आवाजातील अजानमुळे अन्यधर्मियांच्या उपासनेत बाधा येते. सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांमधून होणारे ध्वनीप्रदूषण रोखण्याच्या संदर्भात ३० ऑगस्ट २००० या दिवशी एक स्वतंत्र आदेश दिला आहे. या संदर्भात वेळोवेळी मुंबई उच्च न्यायालयानेही आदेश दिले आहेत. तरी अवैध दर्गा/मशीद यांवरील भोंग्यामुळे होणारे प्रदूषण तात्काळ थांबवावे, तसेच अशा पद्धतीने गुन्हे करणार्‍या संबंधितांवर खटले दाखल करावेत अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

आपला नम्र
हिंदु राष्ट्र समन्वय समिती, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, सकल हिंदू समाज कोल्हापूर
(7020710460 9860370469, 9657066868)

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक
Comments are closed.

Check Also

सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन

सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन कोल्हाप…