no images were found
पुष्पा इम्पॉसिबलमध्ये पुष्पा आपल्या मुलांमध्ये अडकून पडली आहे
सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिका आता एका भावनिक वळणावर पोहोचणार आहे, कारण पुष्पा (करुणा पांडे) आणि टायगर (मुकुल हरीश) यांच्याशी संबंधित अनेक वर्षांपासून लपलेलं एक गुपित अखेर समोर येणार आहे. पुष्पाशी असलेल्या आपल्या नात्याबद्दल उत्तरं शोधत असलेला टायगर, तिच्या कार्यालयात एक मृत्युपत्र शोधून काढतो, ज्यामध्ये तिच्या इतर मुलांसोबत त्याचंही नाव नमूद केलेलं असतं. या शोधामुळे तो ज्या सत्याचा शोध घेत होता, त्याची त्याला खात्री पटते आणि त्याच्या भूतकाळाबद्दलचं त्याचं संपूर्ण आकलन बदलून जातं.
टायगरने मृत्युपत्राचा फोटो काढल्यानंतर तो पुष्पाच्या इतर तिन्ही मुलांना दाखवतो, ज्यामुळे ते सर्वजण हादरून जातात. ते पुष्पाला याबद्दल जाब विचारतात, तेव्हा ती अखेर टायगर हा तिचा मुलगा असल्याचं मान्य करते. हे सत्य समोर आल्यानंतर, 28 वर्षांनंतर आपल्या आईपासून वेगळं राहण्यामागचं कारण समजल्यामुळे टायगरला एक प्रकारचा दिलासा मिळतो. मात्र, याच सत्यामुळे कुटुंबात नवीन संघर्ष निर्माण होतो. पुष्पाची इतर तीन मुलं टायगरला स्वीकारण्यासाठी झगडू लागतात, तर टायगर स्पष्टपणे सांगतो की आईपासून आधीच इतकी वर्षं दूर राहिल्यानंतर तो तिला पुन्हा गमावायला तयार नाही. आपल्या मुलांमध्ये अडकलेली पुष्पा एका अत्यंत कठीण परिस्थितीत सापडते, कारण एका मुलाची बाजू घेणं म्हणजे दुसऱ्याला दुखावणं ठरू शकतं.
पुष्पा आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा मार्ग शोधेल, की टायगरबद्दलचे सत्य त्यांच्यातील नातेसंबंध कायमचे बदलून टाकेल?
ट्रॅकबद्दल बोलताना, करुणा पांडे म्हणाल्या, “पुष्पासाठी हा खूप कठीण काळ आहे कारण तिच्यासमोर कोणताही योग्य किंवा सोपा पर्याय नाही. तिने संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांचं रक्षण करण्यात घालवलं आहे आणि आता टायगरबद्दलचं सत्य तिच्या उभारलेल्या सगळ्या आयुष्याला धोक्यात आणत आहे. त्याच वेळी, तिच्यासाठी ही एक प्रकारची दिलासादायक भावना देखील आहे, कारण अखेर सत्य समोर आलं आहे आणि आता तिला ते लपवण्याचं ओझं वाहावं लागणार नाही किंवा तिच्या आसपासच्या लोकांशी सतत खोटं बोलावं लागणार नाही. या ट्रॅकमधील सर्वात आव्हानात्मक गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असताना पुष्पाच्या मनातील टायगरला गमावण्याची भीती साकारणं.”