Home Uncategorized शिवाजी विद्यापीठात संविधान दिन व शहीद दिन

शिवाजी विद्यापीठात संविधान दिन व शहीद दिन

2 second read
0
0
10

no images were found

शिवाजी विद्यापीठात संविधान दिन व शहीद दिन

कोल्हापूर, :- शिवाजी विद्यापीठात आज संविधान दिन आणि शहीद दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ.राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेस अभिवादन करण्यात येऊन प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.कबीर खराडे यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. त्यानंतर, मुंबईवर 26 नोव्हेंबर, 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले शूर पोलीस अधिकारी आणि जवान यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्यासह वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.धनंजय सुतार, आयक्युएसीचे संचालक डॉ.सागर डेळेकर, डॉ.कैलास सोनवणे, डॉ.सचिनकुमार पाटील, डॉ.प्रकाश बिलावर, अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सावळीराम घाणे, डॉ.मुरलीधर भानारकर, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कोल्हापूरच्या पुढील २० वर्षांच्या विकासाचे नियोजन, सर्वसमावेशक व शाश्वत विकासावर भर

कोल्हापूरच्या पुढील २० वर्षांच्या विकासाचे नियोजन, सर्वसमावेशक व शाश्वत विकासावर भर : …