no images were found
चंदगड येथे सोमवारी रेशीम प्रशिक्षण कार्यशाळा
कोल्हापूर : जिल्हा रेशीम कार्यालय, कोल्हापूर व सेंटर ऑफ एक्सलंस् ॲन्ड इन्क्युबेशन इन सेरीकल्चर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि.23 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता पाटणे फाटा, चंदगड येथे रेशीम प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा रेशीम अधिकारी आर.जी.कांबळे यांनी दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण तथा भुमी उपयोग नियोजन, भारत सरकार, नागपूरचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोक हजारे यांच्या हस्ते व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार तथा पुणे विभागीय संचालक डॉ. अधिकराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच सेंटर ऑफ एक्सलंस् ॲन्ड इन्क्युबेशन इन सेरीकल्चरचे समन्वयक डॉ. एस.आर.यंकची, जिल्हा रेशीम अधिकारी आर.जी.कांबळे, जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक बी.एम.खंडागळे व रेशीम अंडिपुंज निर्मिती केंद्राचे ए.एम.संकपाळ यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे, असेही श्री. कांबळे यांनी कळविले आहे.