Home सामाजिक जागतिक गुंतवणूक सप्ताह उपक्रम सीडीएसएल आयपीएफने केला साजरा, सांगलीत सायकल रॅलीचे आयोजन

जागतिक गुंतवणूक सप्ताह उपक्रम सीडीएसएल आयपीएफने केला साजरा, सांगलीत सायकल रॅलीचे आयोजन

12 second read
0
0
29

no images were found

जागतिक गुंतवणूक सप्ताह उपक्रम सीडीएसएल आयपीएफने केला साजरा, सांगलीत सायकल रॅलीचे आयोजन

सांगली,(प्रतिनिधी): सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटीज कमिशन्स (IOSCO) यांच्या संयुक्त विद्यमाने सीडीएसएल इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडने (CDSL IPF) जागतिक गुंतवणूक सप्ताह 2025 (WIW) साजरा केला. या अंतर्गत ‘सवाल करो, स्कॅम्स को स्लॅम करो’ हा उपक्रम राबवण्यात आला.

      जागतिक गुंतवणूकदार सप्ताहाचा एक भाग म्हणून, सीडीएसएल आयपीएफने सुरक्षित गुंतवणूक तसेच फसवणूक आणि घोटाळे रोखण्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सायकल रॅलीचे आयोजन केले होते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सांगलीतील एस.एस. पाटील हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात सायकल रॅली काढण्यात आली.

      गुंतवणूकदारांना प्रश्न विचारण्यासाठी प्रवृत्त करणे, आपल्या गुंतवणुकीबाबत अपडेट राहण्यासाठी तसेच आर्थिक फसवणूक आणि घोटाळ्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सीडीएसएल आयपीएफने अनेक उपक्रम या अंतर्गत सुरू केले आहेत.

सोमवार, 06 ऑक्टोबर ते रविवार, 12 ऑक्टोबर 2025 या कालावधीत भारतात जागतिक गुंतवणूक सप्ताह साजरा केला जात आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) या उपक्रमासाठी राष्ट्रीय समन्वयक आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत बचत

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत …