no images were found
मल्टी–स्टारर ‘मु.पो.बोंबिलवाडी’ चे पोस्टर प्रदर्शित
मुंबई : हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, वाळवी या तीन मराठी चित्रपटांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या हॅटट्रिकनंतर लेखकदिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी यांनी घोषणा केलेल्या ‘मु.पो. बोंबिलवाडी’बद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना या चित्रपटात हिटलर व चर्चिलच्या भूमिका कोण बजावणार यांबद्दल रसिकांमध्ये कुतूहल होते. हिटलरच्या भूमिकेत ‘क्युट’ प्रशांत दामले झळकणार हे स्पष्ट झाल्यानंतर आत्ता चर्चिलच्या भूमिकेत आनंद इंगळे दिसणार असल्याचे जाहीर झाले आहे. निर्मात्यांनी आज ‘मु.पो.बोंबिलवाडी’ चे पोस्टर प्रदर्शित केले.१ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होवू घातलेल्या या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपट मल्टी-स्टारर आहे. प्रशांत दामले, आनंद इंगळे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, मनमित पेम, रितिका श्रोत्री, प्रणव रावराणे, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, दीप्ती लेले, राजेश मापुस्कर हे चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार चित्रपटात झळकणार आहेत.
परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांच्या गतवर्षी चित्रपटगृहांमध्ये धमाल उडवून देणाऱ्या ‘वाळवी’ला अलीकडे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या ‘नाच गं घुमा’ने यंदा प्रचंड प्रतिसाद मिळविला. हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची. व ची. सौ. का., आत्मपॅम्प्लेट यांसारख्या त्याधीच्या दर्जेदार व गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. राष्ट्रीय पुरस्काराचा आनंद द्विगुणीत करत परेश आणि मधुगंधा यांनी त्यांच्या ‘मु.पो.बोंबिलवाडी– १९४२एका बॉम्बची बोंब’ची घोषणा दोन महिन्यांपूर्वी केली.चित्रपटाच्या घोषणेनंतर प्रदर्शित केलेल्या मोशन पोस्टरवरून ही स्वातंत्र्यपूर्व काळातील एक ब्रिटीशकालीन कथा आहे आणि एका बॉम्बस्फोटाभोवती ती फिरते, अंदाज रसिकांना आला होता. आज प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरच्या माध्यमातून नवनवीन पात्रे रसिकांसामोरे येतात. ती सकारात असलेले कलाकार या पोस्टरमध्ये दिसतात आणि एवढी मोठी स्टारकास्ट असल्याने चित्रपट अत्यंत दर्जेदार असेल, याही खुणगाठ प्रेक्षक आपोआप बांधतो.
या चित्रपटाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक मंडळी यांची असून लेखनदिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या आणि प्रचंड गाजेलेल्या याच नावाच्या नाटकाचे हे चित्रपटीय स्वरूप आहे. रसिकांच्या मागणीवरून ही चित्रपट निर्मिती संहितेत काही बदल करून केली गेली आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना परेश मोकाशी म्हणाले, “मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हे नाटक लोकांना इतके आवडले की तो माझ्यासाठी एक सुखद धक्का होता! ‘बोंबिलवाडी’सारख्या छोट्या गावात इंटरनॅशनल घटना घडतात आणि त्यावर दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा निकाल लागतो ही फार्सिकल गोष्ट आजही तितकाच व्यायाम देईल फुप्फुसांना!”
हा चित्रपट प्रेक्षकांनी का पहावा, असा प्रश्न विचारला असता मोकाशी यांनी मिश्कील उत्तर दिले आहे.“आजकाल व्यायाम नीट होत नाही, त्यामुळे फुप्फुसानाही व्यायाम होत नाही. ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ एवढा हसवतो की त्यामुळे फुप्फुसांना खूप व्यायाम होतो. हे चित्रपट पाहण्याचे आरोग्यदायी कारण आहे.”
चित्रपटाच्या निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या,“आनंदाची बाब म्हणजे प्रशांत दामले यांनी हिटलरचे काम करायला हो म्हटल्यामुळे चित्रपटाचे मूल्य वाढले आहे. चित्रपट आपोआपच मोठा झाला. त्यांनी अप्रतिम काम केले आहे. यात प्रशांत दामले यांच्याबरोबरच इतर कसलेले कलाकार चित्रपटात आहेत, त्यामुळे एक चांगली भट्टी जमून आली आहे. त्यांचे अभिनय उत्तम झाले आहेत. ही एक धमाल लाफ्टर