no images were found
आसिफ यांनी ‘करण अर्जुन’मधील डायलॉग ‘व्हॉट ए जोक’मागील खरी गाथा सांगितली
आसिफ शेख यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या करिअरमध्ये ऐंशीहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि साकारलेल्या प्रत्येक भूमिकेने अमिट छाप सोडली आहे. ते एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये विभुती नारायण मिश्राची भूमिका साकारत आहेत आणि प्रेक्षकांनी या भूमिकेवर भरपूर कौतुकाचा वर्षाव केला आहे, विशेषत: त्यांची सिग्नेचर लाइन ‘आय अॅम सॉरी’ खूप लोकप्रिय ठरली आहे. त्यांची करिअरमधील आणखी एक संस्मरणीय संवाद म्हणजे ‘व्हॉट ए जोक’, जो त्यांनी शाहरूख खान व सलमान खान अभिनीत चित्रपट ‘करण अर्जुन’मध्ये सुरज सिंगची भूमिका साकारताना सादर केला होता आणि आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. चित्रपटामधील सुरज सिंगच्या भूमिकेतील अनुभवाला उजाळा देत आसिफयांनी पडद्यामागील रोमांचक गाथेबाबत सांगितले. ते म्हणाले, ”चित्रपट ‘करण अर्जुन’चे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी मला माझ्या भूमिकेबाबत ओळख करून दिली तेव्हा सांगितले की ‘व्हॉट ए जोक’ हा फक्त संवाद नाही तर सूरजच्या भूमिकेमधील मूलभूत भाग देखील आहे. त्यांची इच्छा होती की सूरजने प्रत्येक गोष्टीला ही प्रतिक्रिया द्यावी, तसेच भूमिकेमध्ये अनपेक्षित, रोमांचक ट्विस्टची भर करावी. पहिल्या दिवसापासून मी प्रत्येक सीनमध्ये ‘व्हॉट ए जोक’ म्हणायला सुरूवात केली, तसेच त्यामध्ये विविध टोन्सची भर करत काहीसे विनोदी व अनपेक्षित बनवले, ज्याबाबत चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी विचार केला होता.”
आसिफ यांनी अचंबित करणारे तथ्य सांगितले की ते या भूमिकेसाठी पहिली निवड नव्हते. ते म्हणाले, ”सुरूवातीला, गुलशन ग्रोव्हर यांना सूरज सिंगच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले होते. त्यांनी विविध सीन्सचे शूटिंग देखील केले होते आणि हा आयकॉनिक संवाद विविध वेळा सादर केला होता. पण, मला ही भूमिका का मिळाली त्यामागील कारणांबात मी आजही पूर्णत: खात्रीशीर नाही. नशीबाला मोठे वळण मिळाले आणि कदाचित माझ्या चिकाटीमुळे ही भूमिका मिळाली असावी. या भूमिकेने मला बॉलिवुड इतिहासामध्ये ‘व्हॉट ए जोक’ संवाद संस्मरणीय करण्याची संधी दिली, ज्याचा मला अत्यंत अभिमान आहे.”