no images were found
मीर तारीक अली यांनी मतदान केंद्राना भेट देवून कामकाजाबाबत घेतला आढावा
कोल्हापूर : 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील कामकाजाबाबत निवडणूक निरीक्षक मीर तारीक अली भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ईव्हीएम स्ट्राँगरुम मतदान केंद्र, पोलीस बंदोबस्त, आदींची पाहणी करुन पुढील कामकाजबाबतच्या सूचना दिल्या.
276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केले निवडणूक निरीक्षक मीर तारीक अली यांनी विवेकानंद कॉलेज, ताराबाई पार्क, कोल्हापूर परिसरातील डॉ. बापूजी साळुंखे स्मृतीभवन येथील ईव्हीएम स्ट्रॉगरुम व प्रशिक्षण ठिकाणांची पाहणी केली. यावेळी 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विजय पवार, करमणूक कर अधिकारी सैपन नदाफ हे उपस्थित होते.
या भेटीदरम्यान सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या ईव्हीएम स्ट्रॉगरुममध्ये तसेच स्ट्रॉगरुमबाहेर अग्निशामक यंत्र ठेवल्याबाबत समाधान व्यक्त करुन बंदोबस्तातील पोलीसांबरोबर चर्चा केली. त्यानंतर निवडणूक निरीक्षक यांनी न्यु मॉडेल इंग्लिश स्कूल, ताराबाई पार्क विवेकानंद कॉलेज परिसरातील तीन मतदान केंद्रांना भेटी दिल्या. या ठिकाणी मतदानावेळी आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करण्याबाबत तसेच मतदारांचा उन्हापासून बचाव होण्यासाठी गेटबाहेरील बाजूस मंडप उभारण्याबाबत आदेश दिले. तसेच मतदारसंघाच्या साहित्य वितरण व स्वीकृती बाबत मार्गदर्शन केले.