Home सामाजिक ‘सवाल करो’ मोहिमेसह IOSCO आणि सेबीचा कोल्हापुरात सायकल रॅलीचे आयोजन

‘सवाल करो’ मोहिमेसह IOSCO आणि सेबीचा कोल्हापुरात सायकल रॅलीचे आयोजन

14 second read
0
0
30

no images were found

‘सवाल करो’ मोहिमेसह IOSCO आणि सेबीचा कोल्हापुरात सायकल रॅलीचे आयोजन

कोल्हापूर,(प्रतिनिधी) : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटीज कमिशन्स (IOSCO) यांच्या संयुक्त विद्यमाने सीडीएसएल इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडने (CDSL IPF) जागतिक गुंतवणूक सप्ताह 2025 (WIW) साजरा केला. या अंतर्गत ‘सवाल करो, स्कॅम्स को स्लॅम करो’ हा उपक्रम राबवण्यात आला.

      जागतिक गुंतवणूकदार सप्ताहाचा एक भाग म्हणून, CDSL IPF ने सुरक्षित गुंतवणूक तसेच फसवणूक आणि घोटाळे रोखण्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सायकल रॅलीचे आयोजन केले होते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून कोल्हापूर येथील डी.सी.नरके वरिष्ठ महाविद्यालयात सायकल रॅली काढण्यात आली.

     गुंतवणूकदारांना प्रश्न विचारण्यासाठी प्रवृत्त करणे, पूर्णपणे अपडेट राहण्यासाठी तसेच आर्थिक फसवणूक आणि घोटाळ्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी CDSL IPF ने अनेक उपक्रम या अंतर्गत सुरू केले आहेत.सोमवार, 06 ऑक्टोबर ते रविवार, 12 ऑक्टोबर 2025 या कालावधीत भारतात जागतिक गुंतवणूक सप्ताह साजरा केला जात आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) या उपक्रमासाठी राष्ट्रीय समन्वयक आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…