Home सामाजिक आरटीआय कायद्याचे अस्तित्व धोक्यात; ॲड. असीम सरोदे यांचे कोल्हापुरात व्याख्यान

आरटीआय कायद्याचे अस्तित्व धोक्यात; ॲड. असीम सरोदे यांचे कोल्हापुरात व्याख्यान

1 second read
0
0
25

no images were found

आरटीआय कायद्याचे अस्तित्व धोक्यात; ॲड. असीम सरोदे यांचे कोल्हापुरात व्याख्यान

कोल्हापूर (प्रतिनिधी ): माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून नागरिकांना मिळालेला माहितीचा अधिकार अधिक प्रभावीपणे जपण्याची गरज असून, गोपनीयतेच्या नावाखाली हा कायदा निष्प्रभ होऊ नये, यासाठी सजग नागरिकांनी कायद्याची योग्य माहिती घेऊन त्याचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संविधान व नागरी हक्क विषयाचे विश्लेषक ॲड. असीम सरोदे यांनी केले.
माहिती अधिकार महासंघ, कोल्हापूर शहर यांच्या वतीने  शाहू स्मारक भवन येथील मिनी हॉलमध्ये “आरटीआय कायद्याचे अस्तित्व धोक्यात?” या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. “गोपनीयतेचा बाऊ करून RTI कायदा निष्प्रभ करणाऱ्या प्रवृत्ती” या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी ॲड. सरोदे यांनी माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व, नागरिकांना उपलब्ध असलेले अधिकार, माहिती देताना गोपनीयतेच्या तरतुदींचा होणारा वापर तसेच माहितीच्या अधिकारासमोरील विविध आव्हाने याबाबत सविस्तर विवेचन केले. लोकशाही व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी माहिती अधिकार कायदा हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष बसवेकर यांच्यासह माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व सजग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे आयोजन माहिती अधिकार महासंघ, कोल्हापूर शहर यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश नागरिकांमध्ये माहिती अधिकार कायद्याबाबत जागृती निर्माण करणे आणि कायद्याचा प्रभावी वापर करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळवून देणे हा असल्याचे माहिती अधिकार महासंघाचे शहराध्यक्ष संतोष रघुनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.
“सजग नागरिक… सशक्त लोकशाही” या विचारातून अशा जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सूत्रसंचालन ऍडव्होकेट किरण साळोखे यांनी केले, व्यासपीठावर ह्युमन राईट्स चे ऍडव्होकेट नारायण पोवार, ऍडव्होकेट आर के जोशी, समारंभाचे अध्यक्ष श्री सुभाष बसवेकर उपस्थित होते व आभार शहराध्यक्ष श्री संतोष कुलकर्णी यांनी मानले

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …