Home Uncategorized हिंदूंवर अन्याय्य कारवाईचा ‘सकल हिंदू समाजा’कडून निषेध!

हिंदूंवर अन्याय्य कारवाईचा ‘सकल हिंदू समाजा’कडून निषेध!

8 second read
0
0
6

no images were found

हिंदूंवर अन्याय्य कारवाईचा ‘सकल हिंदू समाजा’कडून निषेध! पोलिसांना देव-धर्मावर टीका चालते; मात्र अमृताताईंवर टीका चालत नाही !

हिंदुबहुल देशात, हिंदुत्वनिष्ठ सरकारच्या काळात ‘हिंदूंनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही’ !

कोल्हापूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘कुणी श्रद्धा आणि आस्था ठेवून गरब्यात येत असेल, तर त्यांना धर्माचे बंधन नको’, अशी भूमिका मांडली होती. त्यावर काही हिंदुत्वनिष्ठांनी अमृता फडणवीस यांच्या भूमिकेला वैचारिक विरोध दर्शवत ‘सोशल मीडिया’वर (‘एक्स’) पोस्ट करून हिंदुत्वाची बाजू उचलून धरली; मात्र अशा काही हिंदुत्वनिष्ठांवर सायबर विभागाकडून गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, तसेच अनेक हिंदुत्वनिष्ठांचे ‘एक्स’ (ट्विटर) अकाउंट सस्पेंड करण्यात आली आहेत. या पोलिसांच्या कारवाई आम्ही ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने निषेध करत आहोत, हिंदूंवरील गुन्हे मागे न घेतल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असे सकल हिंदू समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवराष्ट्र धर्म संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिलीप भिवटे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, आंतरराष्ट्रीय बजरंग दल-राष्ट्रीय हिंदू परिषदचे जिल्हा संयोजक श्री. पंढरीनाथ ठाणेकर, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदू महासभेचे श्री. मनोहर सोरप, श्री. राजेंद्र तोरस्कर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी हे उपस्थित होते.

नवरात्रोत्सवात गरब्याच्या निमित्ताने हिंदु मुलींशी जवळीक साधून ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना उघडकीला आल्या आहेत. धर्मांतरविरोधी कायदा होऊनही नुकतेच नालासोपार्‍यात ‘लव्ह जिहाद’चे रॅकेट उघडकीला आले. त्यामुळे नवरात्रोत्सवात ‘गरब्यामध्ये अहिंदूंना प्रवेश नको’, अशी ठाम भूमिका हिंदुत्वनिष्ठांनी गेल्या काही वर्षांपासून घेतली आहे. असे असतांना केवळ एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या विधानावर टीका केली; म्हणून हिंदूंवर कारवाई होत असेल, तर हे अतिशय गंभीर आहे. हिंदू बहुसंख्य देशात, हिंदुत्वनिष्ठ सरकार असताना, हिंदुत्वनिष्ठांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का?

धर्मावर, देवी-देवतांवर अश्‍लाघ्य टीका करणारे ध्रुव राठी, कमुनिस्ट नेते, तसेच अराजकता पसरवू पहाणार्‍या ‘सीजेपी’वाले यांच्यावर पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत; मात्र जे हिंदुत्व, राष्ट्र आणि धर्म यांची बाजू मांडतात, हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या पक्षाचा निवडणुकीत प्राणपणाने प्रचार करतात; त्यांच्यावर गुन्हे नोंदवले जातात ! हा कुठला न्याय ? या प्रकारांमुळे ‘हिंदुत्वनिष्ठ सरकारचे पोलीस खाते हिंदूंवरच कारवाई करते’, ही भावना कार्यकर्त्यांमध्ये बळावत चालली आहे.
गरब्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश दिला जावा, अशी भूमिका हिंदुत्वनिष्ठांनी वेळोेवेळी मांडली आहे. जे मुसलमान गरब्यात नाचायला येतात, त्यांच्या धार्मिकतेच्या दृष्टीनेही ही भूमिका अनुकूल आहे; कारण ‘इस्लाम’मध्ये मूर्तीपूजा, तसेच नृत्य-गाणे हे ‘हराम’ आहे. याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्या विधानाला विरोध केला; म्हणून हिंदुत्वनिष्ठांवर नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, तसेच सोशल मीडियावरील पोस्टबाबत सर्वांना समान वागणूक द्यावी, अशी मागणी ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने करण्यात येत आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शिक्षकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत न्याय मिळण्याची अपेक्षा

 शिक्षकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत न्याय मिळण्याची अपेक्षा कोल्हापूर : पुणे विभाग…