Home Uncategorized राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि.27 ऑक्टो व 3 नोव्हें रोजी मॉप अप दिन

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि.27 ऑक्टो व 3 नोव्हें रोजी मॉप अप दिन

2 second read
0
0
9

no images were found

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि.27 ऑक्टो व 3 नोव्हें रोजी मॉप अप दिन

कोल्हापूर : शासनाच्या आदेशाने महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दिनांक 27 ऑक्टोंबर  व दिनांक 3 नोव्हेंबर 2026 रोजी मॉप अप दिन राबविण्यात येणार आहे. बालकांमधील कुपोषण, रक्तक्षय आणि कृमीदोष हा मातीतून प्रसारीत होणा-या जंतामुळे होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तीक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय व कुपोषणाचे कारण तर आहेच तसेच बालकांची बौध्दीक व शारीरीक वाढ खुंटण्याचे कारण ठरतो. कृमीदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात व ती अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. तसेच शाळेतही अनुपस्थित असतात. याचा दुष्परिणाम त्यांच्या भवितव्यावर होतो. म्हणून भारताची भावी पिढी सुदृढ व सशक्त होणेकरिता जंतनाशक गोळया देणे आवश्यक आहे.

त्याअनुषंगाने दि.27 ऑक्टोंबर 2026 रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अंगणवाडी तसेच इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या पटावरील असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे शाळेत न जाणारे सर्व मुले व मुली अशा 1 ते 19 वर्षे वयोगटातील 1,28,937 मुला-मुलींना जंतनाशक गोळया अंगणवाडी व शाळेत देण्यात येणार आहेत. ज्या पात्र लाभार्थ्याना दि.27 ऑक्टोबर 2026 रोजी गोळी देता येणार नाही. त्यांना दि.3 नोव्हेंबर 2026 रोजी मॉप अप दिनी गोळी देणेबाबतचे नियोजन करण्यात आलेले आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य सुधारण्यासोबतच त्यांची पोषणस्थिती आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याचे उद्देशाने ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.

तरी शहरातील सर्व नागरीकांनी आपल्या 1 ते 19 वर्षापर्यंतच्या सर्व पाल्यास जंतनाशक गोळी दयावी असे आवाहन आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

घरफाळा थकबाकीदारांवर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडित

घरफाळा थकबाकीदारांवर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडित थक…