Home Uncategorized घरफाळा थकबाकीदारांवर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडित

घरफाळा थकबाकीदारांवर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडित

0 second read
0
0
9

no images were found

घरफाळा थकबाकीदारांवर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडित

थकीत करापोटी ३ लाख ३५ हजार रुपये जागीच वसूल

कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभाग आणि उपद्रव शोध पथकाच्या वतीने घरफाळ्याची थकबाकी न भरणाऱ्या मिळकतधारकांविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत विभागीय कार्यालय क्रमांक ४, छत्रपती ताराराणी मार्केट अंतर्गत कसबा बावडा येथील गोळीबार मैदान परिसरातील लघु दशरथ बुचडे यांच्या दोन गाळ्यांवर कारवाई करून ते सील करण्यात आले. या गाळ्यांची एकूण थकबाकी १ लाख २२ हजार १८० रुपये आहे.

त्याचप्रमाणे विभागीय कार्यालय क्रमांक १, गांधी मैदान अंतर्गत घरफाळा विभाग आणि उपद्रव शोध पथकाच्या वतीने जवाहरनगर, सुभाषनगर, साळोखेपार्क आणि रविवार पेठ परिसरात थकबाकीदार मिळकतधारकांविरोधात कारवाई करण्यात आली. यामध्ये तीन वाणिज्यिक आणि दोन निवासी अशा एकूण पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडित करण्यात आले. या कारवाईदरम्यान थकीत घरफाळ्यापोटी ३ लाख ३५ हजार रुपये जागीच वसूल करण्यात आले.

ही कारवाई महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, उपआयुक्त परितोष कंकाळ आणि करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये कर अधीक्षक अर्चना प्रभावळे, दत्तप्रसाद माजगावकर, लिपिक सागर सुतार, सुदर्शन घाटगे तसेच उपद्रव शोध पथकातील जवान सहभागी झाले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि.27 ऑक्टो व 3 नोव्हें रोजी मॉप अप दिन

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि.27 ऑक्टो व 3 नोव्हें रोजी मॉप अप दिन कोल्हापूर : शासनाच्या आदेश…