Home धार्मिक लक्षतीर्थचा नवसाला पावणारा गणेशा –

लक्षतीर्थचा नवसाला पावणारा गणेशा –

23 second read
0
0
13

no images were found

 लक्षतीर्थचा नवसाला पावणारा गणेशा – कष्टकऱ्यांची वसाहत अशी ओळख असलेल्या लक्षतीर्थमधील गवळी कुटूंबांच्या श्री प्रेमी मंडळाच्या गणेशाचं सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीन आगमन.

 

   कोल्हापूर (

प्रतिनिधी):-  अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गवळी कुटुंबीयांनी दोन फुटापासून गणेश मूर्ती बसवण्यास सुरुवात केली. या गणेशाच्या आगमनानं गेल्या २० वर्षात गवळी कुटुंबियांसोबतच वसाहत आणि अनेक सेलिब्रेटींचा उद्घार झाला. त्याच्या दर्शनानं जीवन बदलण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. या गणेशाच्या चरणी लिन होण्यासाठी अनेक सेलिब्रेटीं इथं येतात. शनिवारी या मंडळाच्या गणेशाचं मालिकांमधित कलाकार आणि राजकारण्यांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीन जल्लोषात आगमन झालं. गणेशाच्या दर्शनासाठी लक्षतीर्थ वसाहत लोटली होती.

       कोल्हापूरच्या पश्चिम दिशेला पूर्वीचा तोफेचा माळ. शहराचा विस्तार झाला आणि या तोफेच्या माळावर झोपड्या मारून लोकं राहू लागली. याच परिसराला लक्षतीर्थ वसाहत अस देखील म्हटल जात. अतिशय पुण्यभूमी असलेल्या या वसाहतीत झोपडपट्टीमुळ सामाजिक जीवन अस्थिर बनलं होतं.अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि शिक्षणाच्या अभावामुळ अनेकजण खून, मारामारी, चोऱ्यामाऱ्याकडं वळले. त्यामुळं समाजात वसाहतीकंडं पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. या परिसराची ओळख गुन्हेगारांची वसाहत अशी बनली. याच परिसरात गवळी कुटुंबियांचं घर. अविनाश आणि मनोज हे दोघेजण कष्ट करून कुटुंब सांभाळत होते. परिस्थिती नसतानाही त्यांनी दोन फुटी श्री गणेशाच्या मूर्तीची २० वर्षापूर्वी प्रतिष्ठापना केली.

     दरवर्षी या मूर्तीची उंची वाढत गेली. परिस्थिती बदलण्यासाठी गोवा इथं गेलेला मनोज गवळी यांन तिथं सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रात आपला जम बसवला. दरम्यान या गणपतीमुळ अनेकांच्या जीवनाच कल्याण झालं, अशी भावना निर्माण झाल्यानं,अनेक जण या उत्सवासाठी कोल्हापुरात येऊ लागले. गवळी कुटुंबियांनी चक्क २० फुटी गणेश मूर्ती श्री प्रेमी मंडळात बसवण्यास सुरुवात केली.

   नवसाचा श्री गणेश अशी ख्याती झाल्यामुळ नाट्य, मालिका, चित्रपट, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक जण या गणेशाच्या दर्शनाला येतात. सुवर्णालंकार जडीत या गणेश मूर्तीच मनोभावे दर्शन घेतात. यंदा या श्री गणेशाची आगमन मिरवणूक जल्लोषात निघाली. देव माणूस… या मालिकेतील अभिनेत्री वैशाली कल्याणकर आणि अभिनेते किरण गायकवाड तसच साताऱ्याचे नगरसेवक पंकज चव्हाण, उद्योजक मनोज गवळी, अविनाश गवळी यांच्या हस्ते या गणेशाच पूजन झालं. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीला प्रारंभ झाला.

     विद्युत झोतात निघालेल्या गणेशाच्या आगमन मिरवणूकीत सहभागी होण्यासह गणेशाच दर्शन आणि सेलिब्रिटींच्या भेटण्यासाठी अवघी लक्षतीर्थ वसाहत या मिरणूकीकडं लोटली होती. नागरिक आणि गणेश भक्तांनी मनोभावे श्रीं प्रेमींच्या गणेशाचं दर्शन घेतलं. सामाजिक अस्वस्थता आणि आर्थिक अस्थिरता असलेल्या या परिसरात या श्रींच्या प्रतिष्ठापनेमुळ तरुण पिढी गैरमार्ग सोडून भक्ती मार्गाकडं वळलीयं.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक
Comments are closed.

Check Also

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; सांस्कृतिक कार्य विभागाची विशेष मोहीम

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; सांस्कृतिक कार्य विभागाची विशेष मोहीम: जिल्ह्यातील सा…