Home Uncategorized शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कौस्तुभ गावडे प्रयत्नशील राहतील-राजे समरजितसिंह घाटगे यांचा विश्वास

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कौस्तुभ गावडे प्रयत्नशील राहतील-राजे समरजितसिंह घाटगे यांचा विश्वास

1 second read
0
0
7

no images were found

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कौस्तुभ गावडे प्रयत्नशील राहतील-राजे समरजितसिंह घाटगे यांचा विश्वास : नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांच्याकडून आभार व्यक्त

कागल, (प्रतिनिधी) : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर नवनिर्वाचित झालेले आमदार कौस्तुभ गावडे यांनी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा भेट देऊन आमदार गावडे यांचा सत्कार केला.

यावेळी आमदार कौस्तुभ गावडे यांनी कारखाना प्रांगणातील सहकारमहर्षी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोठ्या विश्वासाने कौस्तुभ गावडे यांना पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी दिली. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांनी त्यांच्या उमेदवारीला पाठबळ दिल्यामुळे विधान परिषदेतील सर्वांत तरुण आमदार म्हणून त्यांची निवड झाली. स्वर्गीय राजेसाहेबांपासून घाटगे, साळुंखे आणि गावडे कुटुंबीयांसह शाहू ग्रुप व विवेकानंद परिवाराचे ऋणानुबंध आहेत. आमदार कौस्तुभ गावडे हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व असून, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते निश्चितच प्रभावीपणे प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार कौस्तुभ गावडे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज असलेल्या राजे समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या उच्च शिक्षणाचा आणि अनुभवाचा उपयोग कोल्हापूरच्या विकासासाठी करण्याच्या उद्देशाने राजर्षी शाहू स्टार्टअप मिशनसारखे महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केले आहेत. कोल्हापुरात प्रस्तावित आयटी पार्कसाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांचे सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. या उपक्रमांना चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू. नुकत्याच झालेल्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजे समरजितसिंह घाटगे यांच्या विचारांशी जोडलेल्या शिक्षकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हा विजय साकार झाला, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शाहू उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम -बंगळुरू येथील स्पर्धेत ‘रेलमार्ग’चा गौरव

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम -बंगळुरू येथील स्पर्धेत ‘रेलमार्ग…