Home Uncategorized भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाची मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पाहणी

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाची मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पाहणी

3 second read
0
0
6

no images were found

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाची मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पाहणी

मुंबई  : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कलिना कॅम्पस सांताक्रुज मुंबई येथे भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.राज्यातील संगीत शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासह विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची उभारणी करण्यात येत आहे.

    यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी इमारतीच्या बांधकामाच्या सद्यस्थितीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. तसेच बांधकामाचा दर्जा उत्तम राखण्यासोबतच सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.या महाविद्यालयाच्या माध्यमातून राज्यातील संगीत क्षेत्रातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

   यावेळी महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मुंबई सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

जानेवारीत नशामुक्त – कोल्हापूर दौडचे आयोजन करण्यात येणार – जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड

जानेवारीत नशामुक्त – कोल्हापूर दौडचे आयोजन करण्यात येणार – जिल्हाधिकारी डॉ विज…