Home Uncategorized जानेवारीत नशामुक्त – कोल्हापूर दौडचे आयोजन करण्यात येणार – जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड

जानेवारीत नशामुक्त – कोल्हापूर दौडचे आयोजन करण्यात येणार – जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड

1 min read
0
0
7

no images were found

जानेवारीत नशामुक्त – कोल्हापूर दौडचे आयोजन करण्यात येणार – जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड

कोल्हापूर  :  डिसेंबर 2029 पर्यंत केंद्र सरकारने नशा मुक्त भारताचे स्वप्न पाहिले आहे .त्याचाच एक भाग म्हणून राज्यही नशा मुक्त व्हावे यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. या बाबीला अनुसरूनच संपूर्ण कोल्हापूर जिल्हाही नशा मुक्त व्हावा या उद्देशाने जानेवारी महिन्यात नशा मुक्त दौडचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड म्हणाले.

      जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वापरावर आळा घालण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील अमली पदार्थांच्या बाबतची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हास्तरीय NCORD समितीची बैठक आज शाहूजी सभागृहात करण्यात आली होती.यावेळेस पोलीस अधीक्षक नीलोत्पल हे ही उपस्थित होते.

           जिल्हाधिकारी म्हणाले, अमली पदार्थाच्या अनुषंगाने एमआयडीसीतील बंद कारखान्यांची अचानक  तपासणी करण्यात यावी तसेच जिल्ह्यात उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने गांजा प्रकरणाचा आढावा घेऊन त्यावर कडक कारवाई करावी त्याचबरोबर संबंधित विभागाकडून शालेय – महाविद्यालयीन स्तरावर व्यसनमुक्तीच्या दृष्टीने व्यापक प्रमाणावर प्रबोधन करण्यात यावे असे निर्देश दिले.                                                              तर पोलीस विभागाकडून सन 2026 मध्ये अंमली पदार्थाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण 213 खटले दाखल करण्यात आले असून यापैकी 147 केसेस गांजा सेवनाच्या तर 66 केसेस या अंमली पदार्थाच्या अनुषंगाने दाखल करण्यात आल्या असून या दोन्ही केसेसमध्ये एकूण 270 आरोपींचा समावेश आहे. पोलीस विभागाने चालू वर्षात आजअखेर सुमारे एक कोटी अकरा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असल्याचे सांगून यापुढे नशाखोरांबाबत कडक कारवाई करणार असल्याचा गंभीर इशारा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या बैठकीत दिला .

              या बैठकीसाठी राज्य उत्पादन शुल्काचे उपअधीक्षक युवराज शिंदे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस,सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका दळवी, MIDC चे क्षेत्र व्यवस्थापक एम के कुलकर्णी, अन्न औषध प्रशासनाचे सो.प्र वाढे एलसीबीचे सुशांत चव्हाण, दीपा शिपुरकर,डॉ.व्ही एन आरळेकर आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शासकीय आयुर्वेद व होमिओपॅथी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार  – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

शासकीय आयुर्वेद व होमिओपॅथी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार  …