no images were found
डिकेटीईच्या वतीने इंजिनिअरींगला ऍडमिशन घेवू इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ओपन हाउस सेशनचे आयोजन
इचलकरंजी(प्रतिनिधी) : डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मार्फत १२ वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी व इंजिनिअरींग ला ऍडमिशन धेवू इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मी राजवाडा बोलतोय – ओपन हाउस सेशन ऍट कॅम्पस हा कार्यक्रम शनिवार दिनांक २२ जून २०२४ रोजी सकाळी १०.०० वा डीकेटीई च्या ऑडिटोरिअम हॉल येथे आयोजित केलेला आहे.
राजवाडयात या, पाहा आणि निर्णय घ्या, या धर्तीवर ओपन हाउस सेशन – मी राजवाडा बोलतोय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात मुख्यत्वे करुन विद्यार्थी व पालकांस डीकेटीई येथील लॅबोरेटरीज, वर्कशॉपस, लायब्ररी सुविधा, करिअर गायडन्स सेल, प्लेसमेंट सेल वगेरे सोयी सुविधा प्रत्यक्षात पाहता येणार आहेत तसेच या निमित्ताने हे विद्यार्थी डीकेटीईतील माजी विद्यार्थी यांचेशी संवाद साधू शकतील. तसेच येथील उच्च विभुषीत प्राध्यापकवर्ग यांचेशी विद्यार्थ्यांना संवाद साधून त्यांचा करिअरचा मार्ग सुकर करता येणार आहे.
इंजिनिअरींग मधील विविध पर्याय डोळयासमोर पाहता विद्यार्थी व पालकांनी त्याबदल विस्तृत माहिती घेवून निर्णय घेणे विद्यार्थी हिताचे ठरते या सर्वांचा विचार करुन डीकेटीई मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. करिअरचे क्षेत्र निवडताना आवड आणि क्षमता ठरवून विदयार्थी व पालकांनी एकत्र बसून संवाद साधणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना उज्वल यश प्राप्त करण्यासाठी व उत्तम करिअरच्या संधी प्राप्त होण्यासाठी सदर कार्यक्रमाचा फायदा होणार आहे.
तरी इंजिनिअरींगला ऍडमिशन घेवू इच्छुक विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी या ओपन हाऊस कार्यक्रमास उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन डीकेटीईच्या प्र. संचालिका प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यक्रमाचे प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ.ए.के.घाटगे (मोबाईल नंबर ७०८३२५३६७२) यांचेशी संपर्क साधावा.