
no images were found
ज्ञानेश्वर माऊलींच्या चांदीच्या रथ निर्मितीच्या कामाचा शुभारंभ
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर येथील प्रति पंढरपूर मांडल्या जाणाऱ्या नंदवाळ येथे दरवर्षी आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर प्रमाणेच आयोजित करण्यात येत असलेल्या रिंगण सोहळ्या वेळी मा. श्री. राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ यांनी कोल्हापूर येथून पायी निघणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा चांदीचा रथ करण्याचा संकल्प सोडला होता. त्या संकल्पाची प्रतिपूर्ती म्हणून आज दिनांक 21/12/2023 रोजी विठ्ठल मंदिर, मिरजकर तिकटी येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या चांदीच्या रथ निर्मितीच्या कामाचा शुभारंभ श्री राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. या रथासाठी सुमारे 120 घनफूट सागवान वापरले जाणार असून सुमारे 60 किलो चांदीने हा रथ सुशोभित करण्यात येणार आहे. या रथासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे अभिवचन राजेश क्षीरसागर यांनी दिले असून रथाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन श्री राजेश क्षीरसागर यांनी केले. या रथासाठी लागणारी ट्रॉली पॉप्युलर स्टील वर्क्स च्या श्री राजेंद्र जाधव यांनी दिली असून ज्ञानेश्वर माऊली भक्त मंडळ रथाच्या उभारणीच्या कामात व्यग्र झाले आहे.
सदर उद्घाटन प्रसंगी जिल्हाप्रमुख सुजित भाऊ चव्हाण, माझी महापौर सागर चव्हाण, बाळासाहेब पोवार, दीपक गौड, लाड महाराज, गुरव महाराज, अक्षय पोवार, भगवान तिवले उपस्थित होते.