
no images were found
कल्याणमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी मोठी कारवाई करून पंजाबमधील 3 कुख्यात गँगस्टरांच्या आवळल्या मुसक्या
ठाणे : कल्याणमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्तरीत्या मोठी कारवाई करत पंजाबमधील ३ गँगस्टरना पकडण्यात आले आहे. कल्याणच्या मोहने परिसरातून या तिघांना ताब्यात घेण्यात आले. मुंबई एटीएस, ठाणे एटीएस, नवी मुंबई एटीएस आणि कल्याण खडकपाडा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.
शिवम उर्फ महालोन अवतार सिंग, गुरुमुख सिंग उर्फ गोरा नरेश कुमार आणि अमनदीप कुमार उर्फ गुरमीलचंद अशी या तिघांची नावे आहेत. पंजाबमधील एका हत्येच्या प्रकरणातील हे गँगस्टर होते. मागील काही महिन्यांपासून ते फरार होते. कल्याणमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत या पंजाबमधील 3 गँगस्टरच्या मुसक्या आवळल्या.