no images were found
दोन बसची धडक होऊन भीषण अपघातात ४० ठार ; ८७ जण गंभीर जखमी
सेनेगल : अफ्रिकेतील सेनेगल या देशात दोन बसची समोरासमोर धडक बसली असून या भीषण अपघातात ४० जण ठार झाले असून ८७ जण गंभीर जखमी झाले आहे. मध्य सेनेगलमधील काफ्रीनमध्ये ही घटना घडली असून रविवारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. राष्ट्रीय मार्ग क्रमांक १ वर हा अपघात झाला आहे. या घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांसाठी देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखावटाजाहीर करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष मॅकी सॅल यांनी याबाबत घोषणा केली आहे. अपघातग्रस्त बस मॅरिटानियाच्या सीमेजवळीच रोसोला येथे जात होती. त्याचवेळी बसचा टायर फुटल्याने बस एका बाजूला कलंडली.
त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसने या बसला धडक दिली. त्यामुळं मोठा अपघात घडला. अपघातग्रस्त बसची आसनक्षमता ६० इतकी होती. मात्र, घटनेवेळी बसमध्ये किती प्रवासी होती याबाबत अद्याप अधिकृत आकडा समोर आला नाहीये.अपघातानंतप जखमींना काफिरमधील रग्णालयात आणि वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. तसंच, अपघातग्रस्त बसला घटनास्थळावरुन बाहेर काढण्यात आलं आहे. या अपघाताबद्दल राष्ट्रपती सोल यांनी ट्विट करत दुखः व्यक्त केलं आहे.