Home राजकीय ग्राहकांच्या हक्कांसाठी गोकुळच्या संचालक मंडळात पूनमताई तोडकर यांना संधी द्यावी; पत्रकार परिषदेतून मागणी

ग्राहकांच्या हक्कांसाठी गोकुळच्या संचालक मंडळात पूनमताई तोडकर यांना संधी द्यावी; पत्रकार परिषदेतून मागणी

0 second read
0
0
8

no images were found

ग्राहकांच्या हक्कांसाठी गोकुळच्या संचालक मंडळात पूनमताई तोडकर यांना संधी द्यावी; पत्रकार परिषदेतून मागणी

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या कारभारात दूध उत्पादकांसोबतच लाखो दूध ग्राहकांच्या हितालाही प्राधान्य मिळाले पाहिजे. ग्राहकांच्या हक्कांचा आवाज गोकुळच्या स्वीकृत संचालक मंडळापर्यंत पोहोचवण्यासाठी पूनमताई तोडकर यांची संचालकपदी निवड करण्यात यावी, अशी मागणी प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेतर्फे करण्यात आली. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत पूनमताई तोडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना त्यांनी दूध ग्राहकांच्या विविध समस्या, दुधाचे दर, दुधाची गुणवत्ता, पारदर्शक कारभार आणि ग्राहकांच्या तक्रारींचे प्रभावी निराकरण या विषयांवर प्रकाश टाकला. गोकुळ हा केवळ दूध उत्पादकांचा संघ नसून लाखो ग्राहकांच्या विश्वासाशी जोडलेली सहकारी संस्था आहे. त्यामुळे संघाच्या निर्णयप्रक्रियेत ग्राहकांचेही प्रतिनिधित्व असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्राहकांचे प्रश्न केवळ निवेदने देऊन किंवा आंदोलन करून सुटणार नाहीत, तर निर्णयप्रक्रियेत ग्राहकांचा आवाज असणे गरजेचे आहे. संचालक मंडळात प्रतिनिधित्व मिळाल्यास ग्राहक आणि दूध संघ यांच्यात समन्वय साधून ग्राहकांच्या हिताचे प्रश्न थेट मांडता येतील. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच लोकहिताची कामे प्रभावीपणे करण्यासाठी मोठी मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या समस्यांचे निराकरण आणि गोकुळच्या कारभारात ग्राहकाभिमुख भूमिका निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला सर्व मिडीयातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

विद्यापीठांनी नवोन्मेष, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे -राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विद्यापीठांनी नवोन्मेष, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे -राज्यपाल जिष्…