Home मनोरंजन पुष्पा इम्पॉसिबलमध्ये शनायाला मिळवण्याच्या प्रयत्नात चिरागबद्दलच्या टायगरच्या मत्सरामुळे समोर येणार त्याची काळी बाजू

पुष्पा इम्पॉसिबलमध्ये शनायाला मिळवण्याच्या प्रयत्नात चिरागबद्दलच्या टायगरच्या मत्सरामुळे समोर येणार त्याची काळी बाजू

4 second read
0
0
7

no images were found

पुष्पा इम्पॉसिबलमध्ये शनायाला मिळवण्याच्या प्रयत्नात चिरागबद्दलच्या टायगरच्या मत्सरामुळे समोर येणार त्याची काळी बाजू

 मुंबई, : सोनी सबचा पुष्पा इम्पॉसिबल हा शो पुष्पा (करुणा पांडे) हिच्या आयुष्यात नवनवीन आव्हानं आणत आहे, कारण तिच्या कुटुंबातील नातेसंबंध अधिकाधिक गुंतागुंतीचे होत आहेत. आगामी भागांमध्ये, शनाया (मुस्कान बामणे) हिच्याबद्दल टायगर (मुकुल हरीश) यांच्या वाढत्या भावना आणि चिराग (नितीन बाबू) याच्याविषयी वाढत चाललेला राग यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाची अशी एक बाजू समोर येऊ लागते, जी त्याच्या आसपासच्या प्रत्येकाला दुखावू शकते.

     आगामी भागांमध्ये, पुष्पा आणि चिरागमधील संवाद ऐकल्यानंतर आणि ती चिराग व शनाया यांना एकमेकांच्या अधिक जवळ आणू इच्छिते हे समजल्यानंतर टायगरला स्वतःची फसवणूक झाल्याची भावना होते. यामुळे पुष्पाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो आणि चिरागबद्दलचा त्याचा राग आणखी वाढतो. शनायाचं मन जिंकण्याचा निर्धार करत, टायगर परिस्थिती आपल्या बाजूने वळवू लागतो आणि मुद्दाम चिरागच्या मत्सराला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतो. तो शनायासोबत वाढत असलेल्या जवळिकीचाही वापर चिरागला अस्वस्थ करण्यासाठी करू लागतो. मात्र, चिराग त्याच्या युक्त्यांना बळी पडत नाही आणि शनायाच्या अधिक जवळ जात राहतो, तसतसं टायगरला स्वतःच्या मत्सरावर नियंत्रण ठेवणं अधिक कठीण जाऊ लागतं. चिरागला धडा शिकवण्याची त्याची गरज त्याच्यावर हावी होऊ लागते आणि तो आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही दुखवू लागतो.

टायगरचा मत्सर सूडात बदलत असताना, त्याला हवं ते मिळवण्यासाठी तो किती टोकाला जाईल?

 आगामी कथानकाबद्दल बोलताना मुकुल हरीश म्हणाले, “सध्या टायगर अनेक भावनांशी झुंज देत आहे. तो पुष्पावर रागावलेला आहे आणि तिला दुखावण्यासाठीच हे सगळं करत आहे, कारण त्याला पुन्हा एकदा स्वतःच्या आईकडून फसवल्याची भावना होत आहे. शनायाच्या मनात चिरागसाठी भावना आहेत, हे स्वीकारणंही त्याच्यासाठी खूप कठीण जात आहे. शनायासाठीच्या टायगरच्या भावना हळूहळू मत्सरात बदलतात आणि त्यामुळे तो आपल्या आजूबाजूच्या लोकांना दुखवू लागतो. हा मत्सर हळूहळू त्याच्यावर हावी होऊ लागतो आणि तो केवळ चिरागला त्रास देण्यासाठी निर्णय घेऊ लागतो. या टप्प्याला विशेष बनवणारी गोष्ट म्हणजे टायगर आता तो राहिलेला नाही ज्याला आपण सुरुवातीला भेटलो होतो. तो अधिक धूर्त बनत आहे आणि त्याला हवं ते मिळवण्यासाठी इतरांना दुखवायलाही तयार आहे. टायगरची ही बाजू त्याच्या मनात साचलेल्या वेदना आणि रागातून समोर आली आहे, ज्यांनी त्याला बदलून टाकलं आहे.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

विद्यापीठांनी नवोन्मेष, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे -राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विद्यापीठांनी नवोन्मेष, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे -राज्यपाल जिष्…