no images were found
न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा
कोल्हापूर (प्रतिनिधी):- येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य रवींद्र कुंभार यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व व ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन, त्यांचे संशोधन याविषयी माहिती दिली.
यावेळी विद्यार्थिनींनी ‘अग्निपंख’ या डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे वाचन करून डॉ. कलाम यांचे बालपण, शिक्षण, संशोधन ते मिसाईल मॅन पर्यंतचा थक्क करणारा प्रवास समजून घेतला. कार्यक्रमाची नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वैष्णवी निवेकर, सौ. सई पाटील यांनी केले. यावेळी प्रा. पियुषा नेजदार, प्रा. दिव्या शिर्के, प्रा. निकिता शेटे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.