no images were found
कलाकारांनी त्यांच्या पाकिटात जपलेल्या भावनिक आठवणी शेअर केल्या
मुंबई,: पाकीट ही आपण दररोज सोबत बाळगणाऱ्या सर्वात उपयुक्त वस्तूंमधील एक असते. त्यात आपले पैसे, कार्ड्स आणि इतर आवश्यक वस्तू ठेवलेल्या असतात. मात्र या दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्ये, आपल्यापैकी अनेक जण काही अतिशय वैयक्तिक गोष्टीही जपून ठेवतात. एखादा फोटो, हाताने लिहिलेली चिठ्ठी किंवा एखादी छोटीशी आठवण जपणारी वस्तू. वरकरणी क्षुल्लक वाटणाऱ्या या गोष्टी अनेकदा कथा, भावना आणि आपल्या आयुष्यात सर्वाधिक महत्त्व असलेल्या व्यक्ती व क्षणांच्या आठवणी जपून ठेवतात. यावेळी सोनी सबचे कलाकार अधिक मेहता, मुस्कान बामणे आणि चंदन आनंद यांनी त्यांच्या अशा भावनिकदृष्ट्या जपलेल्या खास वस्तूंबद्दल आणि त्यामागील गोष्टींबद्दल सांगितले, ज्यांच्यापासून ते कधीही दूर होऊ इच्छित नाहीत.
लो चुडैल चली ससुरालमध्ये आरव पटेलची भूमिका साकारणारे अधिक मेहता म्हणाले, “माझ्या मते, आपण सोबत बाळगणाऱ्या सर्वात खास गोष्टी त्या असतात ज्या आपल्याला आपल्या घराची आठवण करून देतात. मला नेहमी माझ्या पाकिटात माझ्या कुटुंबाचा एक छोटासा फोटो ठेवायला आवडतो. काही दिवस असे असतात जेव्हा काम खूप व्यस्त असतं आणि सतत शूटिंगसाठी इकडून तिकडे जावं लागतं, पण त्या फोटोकडे एक क्षण पाहिलं तरी मनाला एक वेगळाच दिलासा मिळतो. तो मला त्या लोकांची आठवण करून देतो जे नेहमी माझ्यासोबत उभे राहिले आहेत आणि जे मला जमिनीवर पाय ठेवून ठेवतात. इतर कोणासाठी तो कदाचित फक्त एक फोटो असेल, पण माझ्यासाठी तो माझ्या सर्वात मोठ्या आधाराची एक छोटीशी आठवण आहे आणि ती गोष्ट मला मी कुठेही गेलो तरी सोबत ठेवायला आवडते.”
पुष्पा इम्पॉसिबलमध्ये शनायाची भूमिका साकारणारी मुस्कान बामणे म्हणाली, “मी अशा व्यक्तींपैकी आहे जी छोट्या-छोट्या गोष्टींशी भावनिकरित्या जोडली जाते, कारण त्या अनेकदा त्या वस्तूपेक्षा खूप मोठ्या आठवणी जपून ठेवतात. माझ्या जवळच्या लोकांकडून मिळालेल्या छोट्या चिठ्ठ्या किंवा आठवणी मी जपून ठेवायला आवडतात. अनेकदा कुणीतरी माझ्यासाठी काहीतरी गोड किंवा प्रेरणादायी लिहून दिलं आहे आणि ते फेकून देण्याऐवजी मी ते माझ्या पाकिटात जपून ठेवलं आहे. ज्या दिवशी मला थोडी प्रेरणा हवी असते किंवा फक्त हसावंसं वाटतं, त्या दिवशी अशा एखाद्या चिठ्ठीवर नजर पडली की मला पुन्हा आनंद मिळतो. माझ्या मते, हाताने लिहिलेले हे छोटे संदेश खूप खास असतात, कारण ते एखादा क्षण आणि भावना जपून ठेवतात, ज्यांना तुम्ही हवं तेव्हा पुन्हा अनुभवू शकता.”
हस्तिनापूर के वीरमध्ये शकुनीची भूमिका साकारणारे चंदन आनंद म्हणाले, “मी नेहमी माझ्या पाकिटात शेरावाली मातेचं एक नाणं शगुन म्हणून ठेवतो. ही एक छोटीशी परंपरा आहे, पण माझ्यासाठी ते नाणं शुभेच्छा, सकारात्मकता आणि सगळं काही चांगलं घडेल या आशेचं प्रतीक आहे. अनेक वर्षांपासून मी या श्रद्धेला जपून ठेवली आहे आणि मी कुठेही गेलो तरी ते नाणं माझ्या पाकिटात कायम असतं याची खात्री करतो. ते मला नेहमी आशावादी राहण्याची आणि प्रत्येक नव्या प्रवासाची सुरुवात शुभेच्छांसह करण्याची आठवण करून देतं. अनेकदा अशा साध्या श्रद्धाच आपल्याला सर्वात जास्त दिलासा देतात.”