no images were found
नोव्हो इंडियाकडून ग्रोथ हार्मोन थेरपीच्या किमतीत 35 टक्क्यांपर्यंत कपात
कोल्हापूर : ग्रोथ हार्मोनची कमतरता असलेल्या मुलांना आणि प्रौढांना उपचार परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावेत, यासाठी नोव्हो इंडियाने नॉर्डिट्रॉपिन® फ्लेक्सप्रो® या औषधाच्या किमतीत 35 टक्क्यांपर्यंत कपात जाहीर केली आहे. नवीन दर 15 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.. त्यामुळे रुग्णांना उपचारांच्या खर्चात मोठी बचत होणार आहे.
ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेमुळे मुलांच्या सामान्य वाढीवर परिणाम होऊ शकतो. नॉर्डिट्रॉपिन® फ्लेक्सप्रो® हे वापरण्यास सोपे ग्रोथ हार्मोन पेन असून, दीर्घकालीन उपचार अधिक सुलभ करण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे.
नोव्हो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत श्रोत्रिय यांनी सांगितले की, किमतीतील कपातीमुळे अधिकाधिक रुग्णांपर्यंत आवश्यक उपचार पोहोचवण्यास मदत होईल. उपचारांची उपलब्धता वाढवणे आणि रुग्णांवरील आर्थिक भार कमी करणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.