no images were found
जत तालुक्यावर कर्नाटक दावा; महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न चिघळणार
बंगळूरू : सर्वोच्च न्यायालयात बुधवारी होणारी सीमाप्रश्नी सुनावणी पुढे ढकलली गेली असली तरी, महाराष्ट्रातील काही गावांवर आपला हक्क सांगून या प्रकरणात अडथळा आणण्याचा कर्नाटकाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.
बोम्मई म्हणाले, ‘‘आमचे सरकार महाराष्ट्रातील कन्नड-माध्यमांच्या शाळांना अनुदान देईल आणि शेजारच्या राज्यात राहणाऱ्या कन्नडिग स्वातंत्र्यसैनिकांना निवृत्तीवेतनही देईल. त्यासाठी आम्ही आवश्यक कागदपत्रे गोळा करत आहोत. आम्ही जत तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न धुमसत असताना कर्नाटकची नवी कुरापत सुरू आहे. जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.