no images were found
महाराष्ट्रातील एकही गांव कुठेही जाणार नाही- फडणवीस
मुंबई : कर्नाटक मुख्यमंत्री यांनी वक्तव्य केलं त्याबाबत लढू आणि आमची गाव आम्ही मिळवू. आपण एका देशात राहतो आपण शत्रू नाही. आम्ही लढू आम्ही आमची गाव कुठेही जाणार नाही असंही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.
2012 साली ठराव केला होता. आता कोणत्याही गावाने कोणताही ठराव केला नाही. 2012 साली आम्हाला पाणी मिळत नाही असं म्हणून त्यांनी ठराव केला होता. ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आम्ही कर्नाटकशी तडजोड करून त्यांना हाव तिथं पाणी देऊन आम्हाला पाणी हवं तिथ घेऊ असा निर्णय केला होता. त्यानंतर सुधारित योजना होती त्या नव्या योजनेमध्ये त्यांना समाविष्ट करण्याचा निर्णय त्यावेळचे तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला होता. तशी योजनाही केली होती. ती तयार झाली आहे, आता त्या योजनेला आपण मान्यता देणार आहोत, आता कोविडमुळे मागच सरकार त्याला मान्यता देऊ शकलं नसेल. त्यामुळे आता त्याला तत्काळ मान्यता देणार आहोत आणि तिथे पाणी पोहचणार आहे. या सर्व योजनाला केंद्र सरकारने पैसे दिले आहेत. आताची कोणती मागणी नाही ही जुनी मागणी आहे. आता कोणतीही मागणी केली नाही. सीमा भागातील आपली लोक आहेत. त्यांना मदत होणार आहे.