Home सामाजिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रम

महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रम

22 second read
0
0
6

no images were found

महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रम

कोल्हापूर,(प्रतिनिधी): ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दि. ९ व १० मार्च २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

            सोमवार दि. ९ मार्च रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत महापालिकेच्या सर्व कायम महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याच दिवशी दुपारी ४ ते ६ या वेळेत नूतन नगरसेविकांचा क्रिकेट सामना शास्त्रीनगर मैदानावर होणार आहे.

मंगळवार दि. १० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता केएमसी कॉलेज, दुधाळी येथे महापालिकेच्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नृत्य, गायन, उखाणे तसेच संगीत खुर्ची या स्पर्धांचा समावेश असून स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्यांना प्रशस्तीपत्रके व बक्षिसे देण्यात येणार आहेत.

            महापालिकेच्या सर्व विभागातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या दोन दिवसांच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर सौ. रूपाराणी निकम व आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.

दरम्यान, महापौर सौ. रूपाराणी निकम यांच्या प्रयत्नातून ‘कोल्हापूर फर्स्ट’ संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेला सीएसआर निधीतून चार स्विपिंग मशिन्स तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबाबतचा कार्यक्रम सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता रेजेंटा हॉल, रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महापौर सौ. रूपाराणी निकम व आयुक्त के. मंजूलक्ष्मी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

इक़बाल खान अक्षय कुमारसोबत ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ मध्ये सहभागी

इक़बाल खान अक्षय कुमारसोबत ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ मध्ये सहभागी सोनी सब वरील आगाम…