Home शैक्षणिक तालुकास्तरीय पोस्टर स्पर्धेमध्ये राजमाता जिजामाता हायस्कूलचे यश

तालुकास्तरीय पोस्टर स्पर्धेमध्ये राजमाता जिजामाता हायस्कूलचे यश

17 second read
0
0
171

no images were found

तालुकास्तरीय पोस्टर स्पर्धेमध्ये राजमाता जिजामाता हायस्कूलचे यश

कोल्हापूर  :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व सीपीआर हॉस्पीटलच्यावतीने तालुकास्तरीय पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील राजमाता जिजामाता हायस्कूलने यश संपादन करुन प्रथम तीन क्रमांकाचे बक्षिस पटकावले आहे. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक श्रावणी प्रसाद हैबती, द्वितीय क्रमांक समर्थ विकास भोसले व तृतीय क्रमांक अनन्या अमित चव्हाण व हरिप्रसाद संताजी चव्हाण यांनी पटकाविला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उपआयुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनिल काटे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, नारायण भोसले, सतीश फप्पे, रमेश कांबळे, नगरसचिव सुनिल बिद्रे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, आस्थापना अधीक्षक राम काटकर, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, रवका अधिकारी प्रशांत पंडत, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, विधी अधिकारी संदीप तायडे, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्राबंरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, माजी नगरसेवक ईश्वर परमार, मुख्याध्यापिका सौ.अंजली जाधव, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनी, अग्निशमन दलाचे जवान, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि.27 ऑक्टो व 3 नोव्हें रोजी मॉप अप दिन

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि.27 ऑक्टो व 3 नोव्हें रोजी मॉप अप दिन कोल्हापूर : शासनाच्या आदेश…