
no images were found
महापालिकेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण
कोल्हापूर :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हरीत कायद्याची प्रतिज्ञा व तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उपआयुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनिल काटे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, नारायण भोसले, सतीश फप्पे, रमेश कांबळे, नगरसचिव सुनिल बिद्रे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, आस्थापना अधीक्षक राम काटकर, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, रवका अधिकारी प्रशांत पंडत, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, विधी अधिकारी संदीप तायडे, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्राबंरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, माजी नगरसेवक ईश्वर परमार, मुख्याध्यापिका सौ.अंजली जाधव, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनी, अग्निशमन दलाचे जवान, अधिकारी, कर्मचारी, नागरि