Home शासकीय जिल्ह्यातील बाल पोलीस अधिकारी यांचे एकदिवशीय प्रशिक्षण संपन्न

जिल्ह्यातील बाल पोलीस अधिकारी यांचे एकदिवशीय प्रशिक्षण संपन्न

5 second read
0
0
36

no images were found

जिल्ह्यातील बाल पोलीस अधिकारी यांचे एकदिवशीय प्रशिक्षण संपन्न

कोल्हापूर :  जिल्ह्यातील बाल पोलीस अधिकारी यांचे एकदिवशीय प्रशिक्षण संपन्न जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कोल्हापूर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मिरॅकल फौंडेशन पुणे, मुस्कान फौंडेशन, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने व पोलीस अधिक्षक कार्यालय यांच्या सहकार्याने विशेष बाल पोलीस अधिकारी, चाईल्ड लाईन, बालगृहाचे सर्व अधिक्षक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्यासाठी J.J.Act २०१५ व POCSO Act २०१२ या कायद्याबाबत एक दिवशीय प्रशिक्षण संपन्न झाले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली.

या प्रशिक्षणास प्रमुख पाहुणे म्हणुन अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, होम डीवायएसपी सुवर्णा पत्की, बाल न्याय मंडळाचे सदस्य परशुराम कुरणे, बाल कल्याण समिती सदस्या पदमजा गारे व शिल्पा सुतार, जिल्हा परिवीक्षा अधिकारी चंद्रशेखर तेली, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते इत्यादी उपस्थित होते. सुमित्रा अष्टिकर (Mentor Pune विभाग), पुजा कडु व शुभांगी घारबुडे मुस्कान फौंडेशन, पुणे यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यास मिरॅकल फौंडेशनचे प्रशिक्षण समन्वयक संकेत शेगांवकर यांचे सहकार्य लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मटेरियल सायन्समध्ये देशातील ‘टॉप-१०’ संशोधकांत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश   

मटेरियल सायन्समध्ये देशातील ‘टॉप-१०’ संशोधकांत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश &…