no images were found
लघुउद्योगासाठी शारिरीकदृष्टया दिव्यांग व्यक्तींना जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत वित्तीय सहाय्य योजना
कोल्हापूर : जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीना लघुउद्योगासाठी वित्तीय सहाय्य (बीज भांडवल) या योजनेअतंर्गत प्रोत्साहान देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असून, सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.
बेरोजगार दिव्यांग युवकांना स्वयंमरोजगार उपल्बध करुन देणे या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय, धंदा, उद्योग सुरु करण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य बँकेमार्फत परतफेडीच्या कर्जाच्या स्वरुपात बिज भांडवल उपलब्ध करुन देण्याची ही योजना आहे. अंध, अल्पदृष्टी, कर्णबधिर, अस्थीव्यंग व मतिमंद सर्व प्रकारचे दिव्यांग या प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे.
या योजनेच्या प्रमुख अटी – अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा, या बाबत डोमीसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. (वैश्विक ओळखपत्र) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखा पेक्षा जास्त नसावे, तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला असावा. अर्जदाराचे वय वर्ष 18 ते 50 असावे, वयाचा दाखला आवश्यक आहे. (शाळा सोडल्याचा दाखला) सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्या नुसार इतर आवश्यक कागदपत्रे (अर्जासोबतची कागदपत्रांची सूची पहावी)
योजनेचे स्वरुप – या योजनेअंतर्गत 1 लाख 50 हजार रुपये पर्यंत प्रकल्प खर्चाची मर्यादा आहे. 20 टक्के एवढी रक्कम अनुदान स्वरुपात व उर्वरित रक्कम 80 टक्के रक्कम बँकेकडून कर्ज स्वरुपात मंजूर करण्यात येते. अर्ज करण्याची पध्दत-अर्ज विहीत नमुन्यात असावा व त्या सोबत कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.