no images were found
दिव्यांग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहान देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण विभागमार्फत आर्थिक सहाय्याची योजना
कोल्हापूर : जिल्ह्यातील दिव्यांग, अव्यंग व्यक्तीच्या विवाह व्हावा याकरिता प्रोत्साहान देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अपंग वधू किंवा वराने अपंगत्व नसलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास या योजनेअतंर्गत 50 हजार रुपयेचे अर्थसहाय्य पात्र लाभार्थ्यांस दिले जाते. सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र दिव्यांग अव्यंग व्यक्तीनी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.
25 हजार रुपये चे बचत प्रमाणपत्र, 20 हजार रुपये रोख स्वरुपात, 4 हजार 500 रुपये संसार उपयोगी साहित्य / वस्तू खरेदी साठी देण्यात येईल. 500 रुपये स्वागत सभारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येईल.
या योजनेच्या अटी व शर्ती – वधू अथवा वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र असावे. ( जिल्हा शल्यचिकित्सक यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र), दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा, विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत या पूर्वी घेतलेली नसावी. विवाह हा कायदेशीर रित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा, विवाह झाल्यानंतर किमान एक वर्षाच्या आत या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्याकडे अर्ज करावा.