Home कृषि कणेरी मठ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप

कणेरी मठ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप

14 second read
0
0
8

no images were found

कणेरी मठ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप

कोल्हापूर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित निवासी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप ९ मार्च रोजी मौजे कणेरी, ता. करवीर जि. कोल्हापूर येथील कणेरी मठ  येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हे शिबिर ५ मार्च ते ९ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.

        शिबिराचा उद्घाटन समारंभ ५ मार्च रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. संजय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. शैलेंद्र कांबळे, सहयोगी अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय ,कोल्हापूर होते.

        या पाच दिवसीय शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. त्यामध्ये स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती रॅली, जागतिक महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर स्पर्धा तसेच पथनाट्य यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मान्यवरांची मार्गदर्शनपर व्याख्यानेही आयोजित करण्यात आली. यामध्ये मा.  डॉ. जानकी भोईटे ( सहाय्यक आयुक्त कामगार कल्याण, इचलकरंजी) डॉ.अभयकुमार बागडे , डॉ. सुनिता वाघमारे ,मा. श्री शेखर थोरात, तालुका कृषी अधिकारी ,कागल ,कोल्हापूर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

       शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला प. पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, श्री सिद्धगिरी संस्थान मठ , कणेरी, कोल्हापूर यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या अनुभवाची शिदोरी देत विद्यार्थ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. भारत कोलगणे, प्रभारी सहयोगी अधिष्ठाता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय, कोल्हापूर होते तसेच मा.बाबासाहेब वाघमोडे, मुद्रांक जिल्हाधिकारी , कोल्हापूर आणि मा. श्री जी. पी. वड्ड, मुख्य कार्यकारी अधिकारी कनेरी मठ आणि मा. डॉ. ज्ञानेश्वर पतंगे (विद्यार्थी कल्याण अधिकारी) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना मा. डॉ. सचिन सातपुते कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी केली.

         समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक कु. स्वरांजली सलगर व कु. ऋतुजा शिंदे यांनी केले, तर  आभार प्रदर्शन कु.योगेश खेत्रे यांनी केले.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी मा. डॉ. भरत भालेराव व मा. डॉ सचिन सातपुते, डॉ.खराडे , डॉ. कुलकर्णी तसेच एम. एम. पाटील( कृषी सहाय्यक), एस . एस. कांबळे( कृषी सहाय्यक),  ए .आर.सावळे, अर्चना हुनुले व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हे श्रमसंस्कार शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In कृषि
Comments are closed.

Check Also

जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ मुंबई, : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल ज…