Home Uncategorized महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांची शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी

महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांची शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी

31 second read
0
0
6

no images were found

महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांची शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी

कोल्हापूर  :- शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, देखभाल व उपलब्ध सुविधांची तपासणी करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी शहरातील विविध ठिकाणच्या स्वच्छतागृहांची पाहणी केली.

            यामध्ये छत्रपती ताराराणी चौक (कावळा नाका)परिसर, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, मध्यवर्ती बस स्थानक शेजारील अवनी संस्थेचे महिला स्वच्छतागृह, राजारामपुरी येथील बाईचा पुतळा परिसर, कॉमर्स कॉलेजजवळील दत्त मंदिर, भाजी मंडई तसेच रेणुका मंदिर परिसर, मंगळवार पेठ परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा समावेश होता.

            या पाहणीदरम्यान आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था तसेच नागरिकांना उपलब्ध असलेल्या इतर सुविधांची तपासणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई ठेवण्याच्या तसेच आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील नागरिकांना स्वच्छ व सुस्थितीत सार्वजनिक स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी संबंधीत अधिका-यांनी सातत्याने पाहणी व आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देश दिले. तसेच रेणुका देवी मंदिर परिसरात तृतीयपंथीयांना स्वतंत्र नवीन शौचालय उभे करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या.

            यावेळी उप-आयुक्त परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहा.आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, उप-शहर अभियंता सुरेश पाटील व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ मुंबई, : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल ज…