Home Uncategorized थकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सील

थकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सील

40 second read
0
0
10

no images were found

थकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाईकपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सील

कोल्हापूर,  : कोल्हापूर महानगरपालिका मालकीचे भाडे तत्वावर दिलेले ए वॉर्डमधील कपिलतीर्थ मार्केट येथील दुकानगाळे भाडे थकवणाऱ्या भाडेकरूंवर इस्टेट विभागाने मंगळवार दि. 10 मार्च 2026 रोजी वसुली मोहिम राबवत कारवाई केली.  मागील थकबाकी तसेच सन 2025-26 या आर्थिक वर्षातील महापालिकेच्या दुकानभाडे भरण्याबाबत संबंधित भाडेकरूंना सूचना देण्यात आल्या. थकबाकी  न भरल्याने कपिलतीर्थ मार्केटमधील पाच दुकानगाळे इस्टेट विभागामार्फत सील करण्यात आले.

            सील करण्यात आलेल्या गाळ्यांमध्ये सलीम बालेचाँद मणेर, अर्जुन अरुण कोळेकर, अरुण सखाराम जाधव, नितीन एकनाथ चेणे तसेच चेअरमन प्रयाग चिखली सहकारी दुधसंस्था यांच्या दुकानांचा समावेश आहे.

            यापुढेही थकबाकीदारांवर अशीच कारवाई करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार दुकानगाळे सील करणे तसेच संबंधित मिळकतींवर बोजा नोंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल. महापालिकेच्या मालकीच्या दुकानांचे भाडेकरूंनी आपली थकबाकी तातडीने भरावी, असे आवाहन इस्टेट विभागाकडून करण्यात आले आहे.

            ही कारवाई अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त किरण धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे तसेच गणेश भोसले, अरुण भोसले, जर्नादन भालकर, रविंद्र कांबळे, अविष्कार भोजे, कल्पना शिरदवाडे, सदानंद फाळके, संजय साळोखे, विक्रम पोवार, सुशांत कवाळे आणि प्रथमेश पोवार यांनी केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ मुंबई, : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल ज…