
no images were found
क्षीरसागर यांच्या स्वागत कामानीजवळ काहीकाळ तणाव
कोल्हापूर : गणेश विसर्जन मार्गावर असलेल्या राजेश क्षीरसागर यांच्या स्वागत कमानीजवळ आल्यानंतर इंगवले यांनी ‘कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला’ अश्या घोषणांसह गाणी लावून नाचल्याने वातावरणात काहीकाळ तणाव निर्माण झाला. दरम्यान कोरोनामुळे मागील दोन वर्षे गणपती मिरवणूक विसर्जनावर अनेक बंधने घालण्यात आली होती मात्र राज्यात यावर्षी मोठ्या जल्लोषात बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. त्यातच पावसाने काहीठिकाणी हजेरी लावली. तरीही नागरिकांनी भर पावसात आनंद साजरा केला तर काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले.
कोल्हापूर महापालिकेच्या निवणुका जसजशा जवळ येतील तशी शहरात रंगत वाढू लागली आहे. दरम्यान काल झालेल्या बाप्पांच्या विसर्जनवेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बंडखोरी केल्यानंतर कोल्हापूर शिवसेना आणि क्षीरसागर यांच्यात जोरदार खडाजंगी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा तयार करण्यात आला होता. अशातच मिरवणुकीवरून कोणताही राडा होऊ नये म्हणून पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली.